california shooting main.jpg 
ग्लोबल

कॅलिफोर्नियात अंधाधुंद गोळीबार, 4 ठार; महिन्यातील 47 वी घटना

सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन- अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियातील ऑफिस कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी झालेल्या गोळीबारात एका मुलासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर एक पोलिस कर्मचारीही या घटनेत जखमी झाला आहे. दरम्यान, लोकांवर अंधाधुंद गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोरही जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लेफ्टनंट जेनिफर अमत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराची ही घटना कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर घडली. 

'लॉस एंजिल्स टाइम्स'च्या वृत्तानुसार, हा गोळीबार बुधवारी सायंकाळी ऑरेंज ऑफिस कॉम्प्लेक्समध्ये झाला. यामध्ये एका मुलासह चार जण ठार झाले. तर पाचवी व्यक्ती जखमी झाली आहे. अद्याप या हल्ल्यामागचे कारण समजू शकलेले नाही. ज्या ठिकाणी गोळीबार झाला. तिथे छोटी-छोटी कार्यालये आहेत. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5.30 वाजता गोळीबाराची माहिती मिळाली. सायंकाळी 7 च्या सुमारास पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले.

कॅलिफोर्नियातील ऑरेंजमध्ये डिसेंबर 1997 नंतर पहिल्यांदा गोळीबार झाला. त्यावेळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत चार जणांना जीव गमवावा लागला होता. हे शहर लॉस एंजिल्सपासून सुमारे 48 किमी अंतरावर आहे. अमेरिकेत मागील दोन आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी अटलांटा स्पामध्येही गोळीबार झाला होता. यामध्ये आशियाई वंशाच्या 6 महिलांसमवेत 8 जणांचा जीव गेला होता. तर कोलोराडोतील एका सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जण ठार झाले होते. 

दरम्यान, अमेरिकेत गोळीबार होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी अनेकवेळा हल्ले झाले आहेत. यामध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अशा पद्धतीच्या गोळीबाराच्या घटनेत 447 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर 325 जण जखमी झालेले आहेत. या महिन्यात आतापर्यंत अमेरिकेत गोळीबाराच्या लहान-मोठ्या स्वरुपाच्या  सुमारे 47 घटना घडल्या आहेत. यामध्ये सुमारे 46 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.  india india 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT