Snake Farming esakal
ग्लोबल

Snake Farming : इथं शेतकरी करतात सापाची लागवड; वर्षाला कमवतात बक्कळ पैसे!

शेती करत असले तरी एका सापाला संपूर्ण चीन घाबरतो

सकाळ डिजिटल टीम

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हटले जाते. जोवर उद्योग व्यवसाय अस्तित्वात नव्हते. तेव्हा लोक शेतीवरच आपला उदरनिर्वाह करायचे. सध्या शेतीतही इतके आत्याधुनिक बदल झाले आहेत की, लोक प्रगत शेती करत आहेत. काही विचित्र लोकही जगात आहेत जे कशाचीही शेती करतात. आज एक असे गाव पाहुयात जे आपल्या शेतात सापाची लागवड करतात.

होय, खरं आहे. हे गाव साधे सुधे नसून ते लोक प्राचीन काळापासून शेती करतात. या शेतीचे स्वरूप आणि त्यातून मिळणारा फायदा बघता लोक मोठ्या प्रमाणावर या शेतीकडे वळत आहेत. चीनच्या झेजियांग प्रांतातील जिसिकियाओ गावात स्नेक फार्मिंगमध्ये लोक सापांचे पालनपोषण करून जीवन जगत आहेत. हे जाणून आश्चर्य वाटेल की या गावातील  सापांना अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, जर्मनी यांसारख्या देशांमध्ये मोठी मागणी आहे.

सापाचे नाव जरी काढले तरी अनेकांच्या शरिराचा थरकाप होतो. पण, चीनमध्ये सापांना भोजन म्हणूनही खाल्ले जाते. त्यामूळे तिथे होणारी शेती तिथल्या नागरीकांसाठी सामान्य बाब आहे. जिसिकियाओ गावात 30 लाखांहून अधिक साप पाळले जात आहेत. या गावात 1980 पासून पारंपरीक शेती न करता साप पालनाचा व्यवसाय केला जात आहे.

गावात 100 हून अधिक शेतकरी असे आहेत. जे कोब्रा, अजगर, वाइपर, रॅटल सारख्या विषारी आणि बिनविषारी अशा ३० लाख सापांची शेती करतात.  साप पालनासाठी काचेच्या किंवा छोट्या लाकडी पेटीत सापांची पिल्ले पाळली जातात. सापाची अंडी हिवाळ्यात उबवतात आणि काही काळानंतर त्यातून पिल्ले बाहेर येतात.

मोठी झाल्यानंतर ती प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करून अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, जर्मनी यांसारख्या देशांमध्ये विकली जातात. चीनच्या झेजियांग प्रांतातील जिसिकियाओ गावात सापांच्या शरिराचे विविध भाग बाजारात चढ्या भावाने विकले जातात.

शेती करत असले तरी फाइव्ह स्टेप हा असा साप आहे, ज्याला अख्खा चीन घाबरतो. हा फाईव्ह स्टेप साप जर एखाद्याला चावला तर त्या वक्तीचा पाच पाऊले टाकताच मृत्यू होतो.

सापाला एवढी मागणी का?

या गावात सापांचा कत्तलखानाही आहे. येथे साप पाळण्याचा व्यवसाय एवढा वाढला आहे की लोकांनी शेती सोडून या कामात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कॅन्सरचे औषध किंवा केमो हे सापाच्या विषापासून बनवले जाते. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. याशिवाय चीनमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या आणि आजारांवर उपचार करण्यासाठी सापाच्या विषाचा वापर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT