mathewson 
ग्लोबल

सिंहांना मॉर्निंग वॉकला नेलं आणि त्यांच्याच हल्ल्यात अंकल वेस्ट यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेतील पर्यावरणवादी (South African conservationist) वेस्ट मॅथ्युसन यांचा सिंहांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दोन पांढऱ्या सिंहांनी त्यांच्यावर हल्ला केला. सिहांना फिरायला घेऊन गेल्यावर हा प्रकार घडला. वेस्ट यांच्या पत्नीने सांगितलं की, पती आणि सिहांच्या पाठीमागून मी कारने येत होते. त्यावेळी हा हल्ला झाला. तेव्हा सिहांचे लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. वेस्ट हे दक्षिण आफ्रिकेतील लिम्पोपो प्रांतात एक सफारी लॉज चालवत होते. लॉयल ट्री टॉप लॉज असं त्याचं नाव होतं. 

वेस्ट यांच्यावर हल्ला करणाऱ्या सिंहिणीला दुसऱ्या गेम लॉजमध्ये नेण्यात आलं आहे. पुढचा काही काळ तिच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. त्यानंतर जंगलात सोडून दिलं जाईल. सिंहिण आधी दुसऱ्या सिंहावर धावून गेली होती आणि अचानक पर्यावरणवादी वेस्ट मॅथ्यूसनकडे वळली. मॅथ्यूसनवर हल्ला केल्यानंतर तिला एका गेम लॉजमध्ये हलवलं आहे. वेस्टला अंकल वेस्ट नावाने ओळखलं जातं. 

वेस्ट मॅथ्युसन सिहांसोबत मॉर्निंग वॉकला गेले होते तेव्हा त्यांची पत्नी गिल पाठीमागून कारने येत होती. तेव्हा टॅनर आणि डेमी या सिंहांनी त्यांच्या डोळ्यादेखतच वेस्ट यांच्यावर हल्ला केला. जोहान्सबर्गपासून 280 किलोमीटर अंतरावर असलेल्या होएडस्प्रुट इथल्या सफारी लॉजच्या परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. 

सिंहांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वेस्ट यांच्या नातेवाइकांनी ही घटना बुधवारी झाल्याचं म्हटलं आहे. वेस्ट मॅथ्यूसन यांनी सिंहांना एका लॉजमध्ये घालून केल्या जाणाऱ्या शिकारीतून वाचवलं होतं. डबाबंद शिकार असंही त्याला म्हटलं जातं. या प्रकारात शिकार करण्यासाठी सिहांना बंदी बनवून एका लॉजमध्ये ठेवण्यात येतं. वेस्ट यांच्यावर हल्ला केलेल्या सिंहिणीने 2017 मध्ये एका व्यक्तीवर हल्ला केला होता. त्याचा यामध्ये मृत्यू झाला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT