modi ji thali Sakal
ग्लोबल

Modi Ji Thali: अमेरिका दौऱ्यापूर्वी न्यू जर्सी रेस्टॉरंटमध्ये 'मोदी जी थाळी' होणार लाँच; व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेतील न्यू जर्सी येथील एका रेस्टॉरंटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ खास थाळी सुरू केली आहे.

राहुल शेळके

Modi Ji Thali in US Restaurant: न्यू जर्सी येथील एका रेस्टॉरंटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ खास थाळी सुरू केली आहे. 'मोदी जी थाळी' या नावाने खास थाळी उपलब्ध करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या सन्मानार्थ ही थाळी सुरू करण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत. पीएम मोदी बुधवार 21 ते शनिवार 24 जून या कालावधीत अमेरिका दौऱ्यावर असतील.

पंतप्रधान मोदींच्या या भेटीपूर्वी न्यू जर्सीमधील एका रेस्टॉरंटने 'मोदी जी थाळी' नावाची थाळी तयार केली आहे. या थाळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

थाळीत कोणते पदार्थ?

थाळीच्या पदार्थांमध्ये खिचडी, रसगुल्ला, दम आलू, इडली, ढोकळा, ताक, पापड आणि बरेच पदार्थ समाविष्ट आहे. त्याची पाककृती श्रीपाद कुलकर्णी यांनी तयार केली आहे. मेनूमध्ये बाजरीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.

अद्याप ग्राहकांसाठी ही थाळी लाँच केली नाही. रेस्टॉरंटच्या मालकाचे म्हणणे आहे की आम्ही लवकरच ते सुरू करू आणि लवकरच डॉ. जयशंकर यांच्या नावाने दुसरी थाळी सुरू केली जाईल.

या प्लेटची किंमत किती आहे?

याच्या किंमतीबाबत रेस्टॉरंटने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. रेस्टॉरंटचे म्हणणे आहे की किंमतीची माहिती लॉन्च झाल्यानंतर दिली जाईल.

पंतप्रधान मोदी जूनमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्यासोबत अमेरिकेच्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. 22 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी देखील मोदींना सरकारी डिनरसाठी होस्ट करतील.

पंतप्रधानांचा हा सर्वात मोठा दौरा:

त्यांच्या या दौऱ्यात मोदी दुसऱ्यांदा अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान असतील. येथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा होईल.

मोदींचा हा दौरा अमेरिकेतील सर्वात मोठा दौरा असेल. या भेटीदरम्यान व्यापार, संरक्षण आणि महत्त्वाच्या मुद्दांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT