Sukhoi-30
Sukhoi-30 file photo
ग्लोबल

सुखोई 'चेकमेट', भारताला रशियाकडून मिळू शकतं हे घातक स्टेल्थ फायटर विमान

दीनानाथ परब

नवी दिल्ली: भारताने रुची दाखवली तर सुखोई 'चेकमेट' (Sukhoi Checkmate) LTA फायटर विमानाच्या निर्यातीवर (export) चर्चा होऊ शकते. आमच्याबाजूने आम्ही सहकार्य करण्यासाठी आणि सर्व प्रस्तावांवर विचार करण्यासाठी तयार आहोत. हवाई तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य सुरु आहे, असे रशिया स्थित रोसटेकच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने फायनान्शिअल एक्स्प्रेस ऑनलाइनला सांगितले.

''भारतीय सैन्य दलांकडे फायटर आणि मालवाहतूक विमानांचा जो ताफा आहे. त्यात ८० टक्के रशियन उपकरणे आहेत. सुखोई-३०, मिग-२९ यूपीजी किंवा नौदलाकडे असेलली मिग-२९ के/केयूबी ही रशियन बनावटीची फायटर विमाने आहेत" असे या अधिकाऱ्याने सांगितले.

"चेकमेट एक निर्यातक्षम प्रकल्प आहे. अत्याधुनिक उपकरण, मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता आणि उड्डाण खर्चही कमी आहे. सुखोई चेकमेटची युद्ध लढण्याची क्षमता लक्षात घेता, या विमानांचा खर्चही कमी आहे. ग्राहकाच्या गरजेनुसार या विमानात बदल करता येतील" असे अधिकाऱ्याने सांगितले.

सुखोई चेकमेट हे पाचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर विमान आहे. चेकमेट प्रकल्पात सुपरकॉम्प्युटर टेक्नोलॉजी वापरण्यात आली आहे. नियोजनानुसार, २०२३ मध्ये सुखोई चेकमेट आकाशात पहिले उड्डाण करेल. एकदा उत्पादन सुरु झाले की, पुढच्या १५ वर्षात ३०० चेकमेट विमान बनवण्याचे लक्ष्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT