Charles Sobhraj  Sakal
ग्लोबल

Charles Sobhraj : 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराज 19 वर्षांनंतर येणार तुरुंगातून बाहेर

70 च्या दशकात चार्ल्सने दक्षिण-पूर्व आशियामध्ये 12 पर्यटकांची हत्या केली होती.

सकाळ डिजिटल टीम

Charles Sobhraj : नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. शोभराजला वयाच्या आधारावर सोडण्यात आले आहे. (Supreme Court of Nepal orders release French serial killer Charles Sobhraj)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

चार्ल्स हत्येच्या आरोपाखाली 2003 पासून नेपाळच्या तुरुंगात बंद होता. चार्ल्सच्या सुटकेचे आदेश देण्याबरोबरच त्याला 15 दिवसांत हद्दपार करण्याचे आदेशही नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

गुन्हेगारी जगतात 'बिकिनी किलर' आणि 'सिरियल किलर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोभराजवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे.

70 च्या दशकात चार्ल्सवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप होता. 70 च्या दशकात चार्ल्सने दक्षिण-पूर्व आशियामध्ये 12 पर्यटकांची हत्या केली होती. या सर्वांचा मृत्यू पाण्यात बुडून, गळा दाबून, चाकूने आणि जिवंत जाळल्याने झाला होता.

व्हिएतनामी वंशाच्या चार्ल्स शोभराजचा जन्म 1944 मध्ये व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहरात झाला. त्याची आई व्हिएतनामची होती आणि वडील भारतीय वंशाचे होते. चार्ल्सचे खरे नाव हत्तचंद भानानी गुरुमुख चार्ल्स शोभराज असे आहे. मात्र, सध्या गुन्हेगारी जगतात तो बिकिनी किलर आणि सीरियल किलर म्हणून प्रसिद्ध आहे. 

चार्ल्सला अनेक भाषांचे ज्ञान
मीडिया रिपोर्टननुसार शोभराज अनेक भाषांमध्ये प्रवीण होता, तसेच आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे तो महिलांशी सहज मैत्री करत असे. महिलांशी मैत्री केल्यानंतर तो त्यांना अंमली पदार्थ देऊन त्यांची हत्या करत असे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT