ग्लोबल

Love Story : दहावी नापास रिक्षावाला पोहोचला स्वित्झर्लंडला

नामदेव कुंभार

प्रेमात लोक काय काय करतील याचा काही नेम नसतो. अनेकजण आपल्या प्रेमासाठी कित्येक मैलाचा प्रवास करतात, तर काही घरच्यांचा नकार झुगारुन प्रेमासाठी वाट्टेल ते करतात. अशीच राजस्थानमधील एका युवकाची प्रेमकथा समोर आली आहे. स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या रणजीत सिंह राज यांची ही प्रेमकथा आहे. राजस्थान ते स्वित्झर्लंड व्हाया फ्रान्स... दहावी नापास असतानाही त्यांनी केलेला हा प्रवास अनेकांना खूप काही शिकवून जातो...त्यांची हटके स्टोरी एकदम फिल्मी आहे... पाहूयात रणजीत सिंह राज यांची लव्ह स्टोरी....

स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा शहरात राहणारे राजस्थानचे रणजीत सिंह राज आजही स्वत:चा संघर्ष आणि लोकांचे टोमणे आठवतात. त्यांना आजही काही प्रसंग आठवतात, जेव्हा बाजारात कोणी कानशीलात लगावल्यानंतर राग अनावर यायचा. दररोज असेच व्हायचं. काही लोक अपमान करायचे याचा रागही यायचा. गरीब होणं, गुन्हा आहे का? मी आधीच गरीब आहे? त्यात तुम्ही आणखी माझा रागाराग करतात? असं का? हा प्रश्न सतावत राहायचा. पण राज यांनी जिद्द सोडली नाही. ते लढले अन् यशाच्या शिखरावर पोहोचले. राज सांगताच, 'गरिब असल्यामुळे लोकांनी खूप छळलं. रंगावरुन हिणवलेही. राग अनावर येत होता. मात्र, आपण काय करु शकतो? सत्य बदलू शकत नाही? असा विचार करुन शांत राहायचो.'

रणजीत सिंह राज सध्या स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा शहरात एका रेस्टॉरंटमध्ये काम करतात. स्वित्झर्लंडमध्येच स्वत:चं रेस्टॉरंट सुरु करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. सध्या ते एक युट्युब चॅनल चालवत असून यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाची माहिती देत आहे. वयाच्या 16 व्या वर्षी रणजीत सिंह राज यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली होती. जयपुरमध्ये अनेक वर्ष रिक्षा चालवली. रणजीत सिंह राज दहावी नापास आहेत. ते सांगतात, शिक्षणात मी तितका चांगला नव्हतो. पण कुटुंबीय मला शाळेत पाठवायचे काहीतरी शिकून मोठा हो, असं नेहमी सांगत होते. पण क्रिएटिव्हिटी आणि इमेजिनेशनला कोणी विचारात नाही, असं मी म्हणायचो. जास्त शिकून काय करायचं? असेही मी घरच्यांना सांगायचो. कारण मला शिकण्यात कोणताही रस नव्हता.

राज यांच्यामध्ये लहानपणापासूनच एक उद्योजक लपलेला होता. जयपूरमधील अनेक रिक्षावाले इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश यासारख्या विदेशी भाषा बोलत असल्याचं राज यांनी रिक्षा चालवताना पाहिलं होतं. हे पाहून तेही प्रभावित झाले होते. त्यावेळी त्यांनी इंग्रजी शिकण्याचा निर्धार केला . 2008 मध्ये सर्वजण आयटीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत होते, अन् राज इंग्रजीच्या मागे लागले होते. राज यांनी त्यावेळी एका मुलाकडून इंग्रजी शिकून घेतली. इंग्रजी शिकल्यानंतर पर्यटन क्षेत्रात कामाला सुरूवात केली. स्वत:ची कंपनीही सुरु केली. या कंपनीअंतर्गत विदेशी नागरिकांना राजस्थान फिरवण्याचं काम सुरु केलं. यावेळी राज यांची मुलाखत एका विदेशी मुलीसोबत झाली. दोघांचेही एकमेंकावर प्रेम जडलं. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेंकावर फिदा झाले. फ्रान्सवरुन भारतभेटीवर आलेल्या त्या मुलीसोबत पहिली भेट सिटी पॅलेसमध्ये झाली. राज यांनी तिला संपूर्ण राजस्थान फिरवलं. यावेळी दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला. राजस्थान फिरल्यानंतर ती मायदेशी परतली. यावेळी स्काइपच्या माध्यमातून दोघांमध्ये संवाद झाला.

दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला होता. दररोज स्काइपच्या माध्यमातून बोलणंही व्हायचं. लाँग डिस्टन्स रिलेशिनशीपला सुरुवात झाली होती. मात्र, कालांतरानं राजला तिला भेटण्याची इच्छा झाली. यासाठी फ्रान्सला जावं लागत होतं. यासाठी पासपोर्ट काढला अन् व्हिसासाठी अर्ज केला. व्हिसासाठी राज यांनी फ्रान्स दूतावासासमोर उपोषणही केलं. त्यानंतर राजला व्हिसा मिळाला मात्र, फक्त तीन महिन्यासाठी. पूर्णवेळ व्हिसा देण्यासा फ्रान्स दूतावासानं नकार दिला होता. तीन महिन्याला ट्रव्हल व्हिसावर राज फ्रान्सला जाऊन येत होते. मात्र, हे किती दिवस चालणार असा विचार त्यांना नेहमी सतावत होता.

2014 मध्ये राजने लग्नही केलं. दोघांना अपत्यही झालं. आता दोघांना सोबत राहायचं अनिवार्य झालं. प्रत्येक तीन महिन्याला ये जा करणं शक्य होतं नव्हतं. त्यामुळे पुर्णवेळ व्हिसासाठी अप्लाय केलं. फ्रान्सचा व्हिसा हवा तर फ्रेंच शिकावं लागेल, असं भारतातील फ्रान्स दुतावासकडून यांना सांगण्यात आलं होतं. जिद्दी राज यांनी फ्रेंच शिकण्यासाठी दिल्लीत क्लासेस लावले. परीक्षाही दिली. पासही झाला. त्याचं प्रमाणपत्रही मिळालं. ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर फ्रान्स दुतावासाकडून राज यांना कायमस्वरुपी व्हिसा देण्यात आला. अशाप्रकारे राज जयपूरवरुन फ्रान्सला पोहचले. सध्या रणजीत सिंह राज आपल्या पत्नी आणि मुलांसोबत स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा शहरात वास्तव्यास आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT