thomas cook airlines
thomas cook airlines 
ग्लोबल

दिवाळखोरीमुळे एअरलाइन्स पडली बंद; जगभरात हजारो प्रवाशांचे हाल

सकाळ डिजिटल टीम

लंडन : ब्रिटनमधील ख्यातनाम थॉमस कुक एअरलाइन्स आणि टूर ऑपरेटर कंपनी बंद पाडली आहे. भांडवला अभावी कंपनीवर दिवाळखोरीची वेळ आली आहे. यामुळे अचानक कंपनीच्या सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहे. परिणामी युरोप आणि अमेरिकेतील अनेक विमानतळावर थॉमस कुकच्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

कंपनीने मागितली माफी
थॉमस कूक ही जवळपास १७८ वर्षे जुनी एअरलाइन्स होती. पण, गेल्या काही वर्षांपासून कंपनी आर्थिक अडचणीत आली होती. या संदर्भात कंपनीने खुलासा केला असून, ‘आमच्याकडे कोणताही पर्याय नसून, या क्षणी कंपनीच्या सर्व सेवा बंद करण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नाही. सर्व आर्थिक पर्यायांची चाचपणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर फॅनखाऊसर यांनी यानंतर थॉमस कुकच्या सर्व प्रवाशांची आणि ग्राहकांची तसेच पुरवठादार आणि कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.

कधी झाली घोषणा?
लंडनमध्ये स्थानिक वेळेनुसार कंपनी पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांनी थॉमस कूकने दिवाळखोरीची घोषणा केली. त्यानंतर जगभरातील विशेषतः युरोपमधील थॉमस कुकच्या प्रवाशांचा एअरपोर्टवर खोळंबा झाला. दिवाळखोरी जाहीर झाल्यानंतर त्याच क्षणापासून थॉमस कुकच्या तिकिटांची विक्री थांबवण्यात आली. पण, प्रवासात असलेल्या विमानांची सेवा रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहील, असे कंपनीने स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांवर बेकारीच कुऱ्हाड
ब्रिटनमधील नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानेहीत या संदर्भात ट्विटवरून घोषणा केली आहे. थॉमस कुकचे जगभरात जवळपास दीड लाख ग्राहक आहेत. तसेच कंपनीत जवळपास २१ हजार कर्मचारी काम करत आहेत. थॉमस कुकच्या टूरमधून जे प्रवासी सहलीला गेले आहेत. त्यांना परतीच्या प्रवासासाठी ब्रिटनच्या नागरी हवाई उड्डाण विभागाकडून रिटर्न फ्लाईट्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. थॉमस कुकला भांडवलाची चणचण भासत होती. कंपनीला २० ते २५ कोटी पाऊंड भांडवलाचा तुडवडा जाणवत होता. येत्या आठवडाभरात कंपनीला हे भांडवल उभे करायचे होते. पण, सर्व पर्याय संपल्यामुळे अखेर कंपनी दिवाळखोरीत निघाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT