DONALD TRUMP USA.jpg 
ग्लोबल

भारत - चीन संघर्षावर ट्रम्प यांचे वेट अँड वॉच  

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : भारत आणि चीन यांच्यात सीमावादावरून सुरु असलेल्या तणावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांशी चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे. भारत आणि चीन यांच्यात मे महिन्यातील ५ तारखेपासून पूर्व लडाख मधील गलवान खोरे, पेंगोंग त्सो, डोमचाक आणि दौलत बेग ओल्डी या भागातील वर्चस्वावरून वाद उफाळला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील सध्याच्या परिस्थितीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिंता व्यक्त केली असून, यावर आपले लक्ष असल्याचे म्हटले आहे. 

भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून लडाख मधील सीमारेषेवरून मतभेद सुरु आहेत. पूर्व लडाख मधील गलवान खोरे, पेंगोंग त्सो, डोमचाक आणि दौलत बेग ओल्डी या परिसरातील हक्कावरून भारत आणि चीन यांच्यातील सैन्य आमने-सामने येत बाचाबाची झाली होती. त्यानंतर या वादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनमध्ये प्रशासकीय व लष्करी पातळीवर चर्चा सुरु होती. मात्र सोमवारी १५ जून रोजी रात्री भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात मोठी  धुमश्चक्री झाली होती. यामध्ये भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्यासह २० जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. यानंतर भारताने देखील लडाख मधील आपली लष्करी कुमक वाढवत चीनला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे एकंदरीत या परिस्थितीमध्ये चालू असलेल्या सीमा तणावाचे निराकरण करण्यासाठी अमेरिका, भारत आणि चीन या दोन्ही देशांशी चर्चा करीत असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल शनिवारी सांगितले आहे.  

भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या वादावर बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, दोन्ही देशात अत्यंत कठीण परिस्थिती असल्याचे म्हणत, दोन्ही देशांशी आपली बोलणी चालू असल्याचे म्हटले आहे. ओक्लाहोमा येथे आगामी निवडणूक सभेसाठी जाताना डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकारांनी भारत आणि चीन यांच्यासंबंधित विचारले असता त्यांनी वरील भाष्य केले आहे. सोबतच भारत आणि चीन यांच्या सीमेवर स्फोटक वातावरण असून, आणि काय घडेल ते पाहू, तसेच या वादावर तोडगा काढण्यासाठी मदत व प्रयत्न करू, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी नमूद केले आहे. 

दरम्यान, यापूर्वी अमेरिकेच्या प्रशासनाने खासकरून परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीओ यांनी चीन सैन्याच्या हल्ल्याविरूद्ध भारताला पाठिंबा दर्शवला होता. इतर देश कोरोना महामारीचा सामना करत असल्यामुळे नेमके याचाच फायदा चीनने सीमा भागात घेतला असल्याचा आरोप माईक पोम्पीओ यांनी केला होता. शुक्रवारी १९ तारखेला माईक पोम्पीओ यांनी कोपेनहेगन येथील लोकशाही परिषदेच्या वेळी  'युरोप आणि चायना' या विषयावर बोलताना चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला लबाड असे संबोधले होते.      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

SCROLL FOR NEXT