Turkey Earthquake  Sakal
ग्लोबल

Turkey Earthquake : शक्तिशाली भूकंपात तुर्की-सीरियामध्ये 300 हून अधिक ठार; हजारो जखमी

तुर्की आणि सीरियामध्ये बसलेल्या या भीषण भूकंपानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Earthquake In Turkey : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आज सकाळी बसलेल्या ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने मोठा हाहाकार माजला आहे.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात जवळपास ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे तर, हजारो नागरिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात इमारती उद्धस्त झाल्या आहेत. त्यू झाला आणि अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या.

सध्या या ठिकाणी बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक वेळेनुसार पहाटे ४.१७ वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला आणि काही मिनिटांनंतर मध्य तुर्कस्तान पुन्हा एका भूकंपाने हाजरले. तुर्कस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर ७.८ इतकी मोजली गेली.

या घटनेनंतर भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचाव पथके तातडीने पाठवण्यात आली असून, आम्हाला आशा आहे की, आम्ही एकत्रितपणे या आपत्तीवर लवकरात लवकर आणि कमीत कमी नुकसानासह मात करू, असा विश्वास तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी घटनेनंतर व्यक्त केला आहे.

तुर्की आणि सीरियामध्ये बसललेल्या भूंकपाचा धक्का देशातील 10 शहरांना बसला असून, यामध्ये वित्त आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. मोठा फटका बसलेल्या शहरांमध्ये काहमेनमार्श, हाताय, गझियानटेप, उस्मानी, अदियामान, सानलिउर्फा, मालत्या, अदाना, दियारबाकीर आणि किलिस यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

दरम्यान, तुर्की आणि सीरियामध्ये बसलेल्या या भीषण भूकंपानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. तसेच घटनेत मृत व्यक्तींच्या कुटुबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती मिळे ही इच्छा व्यक्त केले आहे. तसेच जखमी लवकरात लवकर बरे होवो अशी प्रार्थना केली आहे.

या भीषण परिस्थितीत भारत तुर्कस्तानच्या नागरिकांसोबत खंबीर उभा असून, या परिस्थितीत सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT