Twitter Logo
Twitter Logo sakal
ग्लोबल

Twitter Logo : इलॉन मस्कनी खेळली एक खेळी अन् Dogecoin पोहचला चंद्रावर

निकिता जंगले

Twitter Logo : इलॉन मस्कनी ट्वीटरचा मालकी हक्क घेतल्यानंतर तो वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आला. कधी ट्विटरच्या नियमांमध्ये बदल तर कधी काही.. आता पुन्हा इलॉन मस्क चर्चेत आलाय. इलॉन मस्कने चक्क ट्वीटरचा लोगो चेंज केल्याने सगळीकडे एकच चर्चा रंगलीय.

इलॉन मस्कने ट्वीटरचा लोगो चेंज करुन चिमणी ऐवजी चक्क 'डॉज' हा आपला नवा लोगो बनवला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का इलॉन मस्कनी ही एक खेळी खेळली आणि त्याचा थेट परिणाम Cryptocoinवर झालाय. Dogecoin मध्ये वाढ झाली.

इलॉन मस्कनी लोगो चेंज केल्यानंतर अगदी 30 मिनिटांमध्ये Dogecoin $0.077 वरुन $0.10 वर गेलाय.CoinMarketCap.com च्या मते, dogecoin ही आठवी सर्वात मुल्यवान cryptocurrency आहे.

Dogecoin म्हणजे काय?

सॉफ्टवेअर इंजिनीअर बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी 2013 मध्ये Dogecoinची एक ज्योक म्हणून सुरुवात केली होती. ही एक ओपन सोर्स डिजीटल चलन आहे. Dogecoin (DOGE) लोकप्रिय "डोगे" इंटरनेट मीम वर आधारीत आहे, आणि याच्या लोगोवर एक शीबा इनू या जातीच्या कुत्र्याचा फोटो आहे.

लोकांनी फक्त मजेसाठी ही करंसी वापरावी, यासाठी ही तयार केली होती. जरी Dogecoin ची ज्योक म्हणून सुरुवात झाली परंतु सोशल मीडिया आणि मीम्सच्या जोरावर आज ती जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सींपैकी एक बनली आहे .

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन. याचे व्यवहार ऑनलाईन होत असतात. ही चलनपद्धती नगदी चलनाला पर्याय असणारी एक डिजीटल किंवा व्हर्च्युअल करन्सी आहे. जी वापरण्यासाठी इंटरनेटची गरज पडते. या चलनाची साठवणूक करणेही धोकादायक ठरू शकते कारण यावर कोणत्याही सरकारचे किंवा बँकेचे नियंत्रण नसते. यामधील बिटकॉइन हे प्रसिद्ध अभासी चलन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: बारावीच्या परीक्षेचा निकाल आज; असा पाहा ऑनलाइन पद्धतीने निकाल

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आडेवारी समोर

आजचे राशिभविष्य - 21 मे 2024

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

SCROLL FOR NEXT