Twitter New Features sakal
ग्लोबल

Twitter New Features : आता ट्विटरवर करता येणार Voice अन् Video चॅट, वाचा सविस्तर...

ट्विटर लवकरच युजर्ससाठी Voice आणि Video चॅट चे फीचर आणणार आहे. याविषयी इलॉन मस्कने स्वत: ट्वीट करत माहिती दिली.

निकिता जंगले

गेल्या काही महिन्यांपासून ट्विटर कोणत्याना कोणत्या कारणावरुन सतत चर्चेत येत असतं. मागील वर्षी इलॉन मस्कने ट्वीटर खरेदी केल्यानंतर ट्वीटरवर अनेक बदल करण्यात आले. ब्लू टिक हटवण्याचा मुद्दा सुद्धा मागील काही दिवसांमध्ये बराच गाजला. आता इलॉन मस्कने आणखी एक नवी घोषणा केली आहे. मुळात घाबरण्याचं काहीही कारण नाही कारण यावेळी इलॉन मस्कने आपल्या युजर्सला आनंदाची बातमी दिली आहे.

ट्विटर लवकरच युजर्ससाठी Voice आणि Video चॅट चे फीचर आणणार आहे. याविषयी इलॉन मस्कने स्वत: ट्वीट करत माहिती दिली.

इलॉन मस्कने ट्वीटमध्ये सांगितले, "Encrypted DMs V1.0 उद्या रिलीज होणार आहे. या एन्क्रिप्शनद्वारे कोणीही तुमचा डीएम पाहू शकणार नाही. सोबतच व्हॉईस आणि व्हिडिओ चॅटचे फीचरही लवकरच येणार आहे ज्यामुळे तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्तीशी फोन नंबरशिवाय व्हिडीओ कॉलवर किंवा व्हॉईस चॅटवर बोलू शकणार."

यामुळे आता ट्वीटरवर लवकरच मोठे बदल पाहायला मिळतील. व्हिडीओ कॉल किंवा व्हॉईस चॅटची सुविधा सुरू झाल्यानंतर ट्वीटरवर युजर्सच्या संख्येत भर पडू शकतो ज्याचा फायदा इलॉन मस्कला नक्की होणार. इलॉन मस्क यासोबतच इनअॅक्टीव्ह अकाउंटसुद्धा बंद करणार आहे.

ट्विटरवर असे बरेच अकाउंट आहे ज्यावर पोस्ट शेअर केल्या जात नाही आणि बऱ्याच दिवसांपासून इनअॅक्टीव्ह आहे. अशा अकांउटला शोधून हे अकाउंट्स ट्वीटर लवकरच बंद करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT