1) दा माओ हा नर पांडा बांबूचे तुकडे खाताना. 2) इर शून ही पांडा मादी बांबू खाताना. 
ग्लोबल

दोन चिनी पांडा कोवळ्या बांबूअभावी त्यांचा वांधा

यूएनआय

कॅल्गरी (कॅनडा) - कॅनडातील एका प्राणीसंग्रहालयातील पांडाची जोडी चीनला परत पाठवायचे ठरले आहे. याचे कारण म्हणजे या पांडांचे खाद्य असलेल्या कोवळ्या बांबूचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. इर शून आणि दा माओ अशी या धिप्पाड पांडांची नावे आहेत. कोरोना महामारीमुळे लॉकडाउन लागू होऊन सागरी वाहतुक बंद आहे. बांबूचा तुटवडा निर्माण होण्याचे हे कारण आहे. यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. अद्याप तारीख नक्की झाली नसली तरी पुढील आठवड्यात तिबेटी अस्वलांची जोडी परतेल अशी अपेक्षा आहे.

कोरोनामुळे अत्यंत आव्हानात्मक आणि अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना परत पाठविण्याचा निर्णय घेणे अत्यंत कठोर ठरला, पण आपण ज्या प्राण्यांवर इतके प्रेम करतो आणि त्यांची काळजी घेतो ते पाहता त्यांची प्रकृती आणि कल्याण सर्वाधिक महत्त्वाचे ठरते.
- डॉ. क्‍लेमेंट लॅंथीयर, प्राणीसंग्रहालयाचे सीईओ

खाद्य - दिवसाला ४० किलो
एक सप्टेंबर २००८ रोजी जन्मलेला दा माओ हा पांडा आता १२ वर्षांचा आहे. वयानुसार तो प्रौढ आहे. एक प्रौढ पांडा दिवसाला सरासरी ८८ पौंड (सुमारे ४० किलो-३९.९१६१) इतक्‍या वजनाची बांबूची पाने खातो. इर शूनचे वय १३ आहे.

दृष्टिक्षेपात

  • कॅनडा-चीन यांच्यात २०१४ मध्ये करार
  • पांडा दहा वर्षे कॅनडात ठेवणार
  • पहिली पाच वर्षे टोरांटोमधील प्राणीसंग्रहालयात
  • मार्च २०१८ मध्ये कॅल्गरी प्राणीसंग्रहालयात आगमन
  • तेव्हा त्यांना जिया पॅनपॅन व जिया युएयुए ही पिल्ले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हवामानाचा अंदाज अन् पायलटनं फिरवला निर्णय; राहुल गांधींच्या विमानाला का करावं लागलं 'गो-अराउंड'? लँडिंगच्या १० मिनिटांपूर्वी काय घडलं?

Thalapathy Vijay Assembly Row : हनुवटीवर हात अन् MISA कायद्याचा संदर्भ; स्टॅलिन यांच्यावरील 'त्या' कृतीवर विधानसभेत गदारोळ का झाला? थलपथी विजय यांचं स्पष्टीकरण

२ वर्षाची झाली दुआ पादुकोण सिंह! रणवीर- दीपिकाने शेअर केले खास फोटो; अभिनेत्रीच्या बेबी बम्पने वेधलं लक्ष

Education Awards: डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने स्वारातीमच्या दोन प्राध्यापकांचा गौरव

युद्धाचा भडका आणि जागतिक संकट, तरीही भारतीय अर्थव्यवस्था सुरक्षित कशी? PM मोदींनी स्पष्टच सांगितलं...

SCROLL FOR NEXT