UAE Lottery esakal
ग्लोबल

UAE Lottery : भारतीय ड्रायव्हरला यूएईमध्ये 33 कोटींची लॉटरी; वरिष्ठांनी दिला होता महत्त्वाचा सल्ला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः एका भारतीय ड्रायव्हरला संयुक्त अरब अमिरातीमध्ये लॉटरी लागली आहे. तीही एक-दोन नव्हे तर ३३ कोटी रुपयांची. सदरील चालक हा एका ज्वेलरी कंपनीसाठी काम करतो.

या ड्रायव्हरचं नाव अजय ओगुला असं आहे. 'एमिरेट्स ड्रॉ' ईएएसवाय ६चे पहिल्यांदाच त्याने दोन तिकीटं घेतली. त्यानंतर त्यांच नशिबच उजळलं.

हेही वाचा- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

अजयचं वय ३१ वर्षे आहे. सध्या तो ज्वेलरी कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो. अजय हा मुळचा दक्षिण भारतातील एका छोट्या खेड्यातला आहे. चार वर्षांपूर्वी तो यूएईमध्ये कामधंद्यासाठी गेला होता.

विशेष म्हणजे ओगुला याला त्याच्या वरिष्ठांनी दिलेला सल्ला कामी आला आहे. त्यांने गल्फ न्यूजला सांगितलं की, सीनिअरसोबत चर्चा करत असतांना एमिरेट्स ड्रॉबद्दल माहिती ऐकली होती. वरिष्ठांनी मला इथे लक्ष द्यायला सांगितंल. मग मी दोन तिकीटं विकत घेतली.

माहितीनुसार पहिल्याच प्रयत्नात अजयने लॉटरी जिंकली. त्याने एमिरेट्स ड्रॉ मोबाईल अॅप घेतलं. त्यानंतर लॉटरीची दोन तिकीटं खरेदी केली. जेव्हा कंपनीकडून लॉटरी जिंकल्याचा त्याला मेल आला तेव्हा त्याच्या आनंदारा पारावार उरला नाही.

सुरुवातीला अजयला वाटलं जिंकलेली रक्कम जेमतेम असेल. परंतु नीट आकडा बघितला आणि तो आवाक् झाला. या पैशांमधून गावी घर बांधणार असल्याचं अजयने सांगितलं. यासह एक स्टार्टअप कंपनी सुरु करण्याचाही त्याचा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! बदला घेण्यासाठी शिक्षकाने 426 विद्यार्थ्यांच्या अन्नात घातलं फिनाईल; आरोपी शिक्षकाला तत्काळ अटक, नेमकं काय घडलं?

आम्हाला कोणी वेगळं नाही करु शकतं, गणेशोत्सवात गोविंदा-सुनिता एकत्र, सुनीता म्हणाली...'गोविंदा फक्त माझाय.'

Panchang 28 August 2025: आजच्या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे

Manoj Jarange : शिवनेरी किल्ल्यावरुन तुम्हाला शब्द देतो... मनोज जरांगेंचे फडणवीसांना मोठे आवाहन

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक; एलओसीलगत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT