Ukrain Russia Crisis
Ukrain Russia Crisis e sakal
ग्लोबल

युद्ध अटळ? युक्रेनजवळ रशियाचे दीड लाख सैनिक तैनात, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष (Ukrain Russia Crisis) अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी नवीन इशारा दिला आहे. रशियन रणगाडे युक्रेनच्या दिशेने सरकू लागले आहेत, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर विभागातील सूत्रांनी केला आहे. या सूत्रांनुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी रशियन सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले असून आता हल्ल्याची अंतिम तयारी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

युक्रेनवर थेट हल्ला करण्यापूर्वी रशिया सायबर हल्ला करेल, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर सूत्रांनी केला आहे. त्यानंतर भूदल युक्रेनची शहरे ताब्यात घेतील. रशियन आघाडीच्या सैन्याच्या वाहनांवर, रणगाड्यांवर Z अक्षरे रंगवण्यात आली असून हे रणगाडे युक्रेनच्या सीमेकडे जाताना दिसत आहेत. याबाबत न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे.

अमेरिकन इंटेलिजन्सच्या अहवालात असे म्हटले आहे की, युक्रेनजवळ तैनात असलेल्या 1.50 लाख रशियन सैनिकांपैकी 40 ते 50 टक्के सैन्य लवकरच युद्धात सहभागी होईल. पण, युक्रेनमध्ये देखील रशियासारखेच रणेगाडे आणि वाहने आहेत. त्यामुळेच त्यांच्याच सैन्याने गोळीबार होऊ नये म्हणून अशा खुणा वाहनावर केल्या आहेत, असा दावा युक्रेनियन विश्लेषकांनी केला आहे.

रशियामध्येही हल्ले होऊ शकतात -

मॉस्कोमधील अमेरिकन दूतावासाने मॉस्को, सेंट पीटर्सबर्गसह अनेक शहरांवर हल्ला होण्याचा इशारा देण्यात आला आहे. युक्रेनसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान रशियाच्या अनेक शहरांमध्ये शॉपिंग सेंटर, रेल्वे आणि मेट्रो स्टेशन आणि सार्वजनिक ठिकाणांवर हल्ले होऊ शकतात, असा इशाराही दिला आहे. याबाबत स्थानिक माध्यमांनी वृत्त दिलं आहे.

जर्मनी-ऑस्ट्रियाने नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले -

युद्धाच्या भीतीने जर्मनी आणि ऑस्ट्रियाने आपल्या नागरिकांना येत्या काही दिवसांत युक्रेन सोडण्यास सांगितले आहे. जर्मन विमान कंपनी लुफ्थान्साने राजधानी कीव आणि ओडेसा येथे जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. कीवमधील नाटोच्या संपर्क कार्यालयाने सांगितले की ते ब्रुसेल्स आणि पश्चिम युक्रेनियन शहर ल्विव्ह येथे कर्मचार्‍यांना स्थलांतरित करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT