Ukraine Attack On Zaporizhzhia Nuclear Plant Esakal
ग्लोबल

Russia-Ukraine War: रशियाला युक्रेनचा दणका! अनुप्रकल्पावर जोरदार हल्ला

Zaporizhzhia Nuclear Plant: रशिया आणि युक्रेन यांनी वारंवार एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे आणि त्यामुळे अणु अपघाताची शक्यता वाढली आहे.

आशुतोष मसगौंडे

Ukraine Attack On Zaporizhzhia Nuclear Plant:

रशियाच्या नियंत्रिणाखाली असलेल्या झापोरिझ्झिया अणु केंद्रावरील शटडाउन अणुभट्टीवर रविवारी युक्रेनने हल्ला केला, असे प्लांटच्या रशियाने नेमलेल्या प्रशासनाने सांगितले.

या हल्ल्यासाठी कोणते हत्यार वापरण्यात आले हे स्पष्ट होऊ शकले नाही. 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियन सैन्याने ताब्यात घेतलेल्या अणु प्रकल्पावर हा ड्रोन हल्ला होता, असे रशियन सरकारी अणु एजन्सी Rosatom ने सांगितले.

प्लांट अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हल्ला झाला तेव्हा रेडिएशनची पातळी सामान्य होती आणि हल्ल्यानंतर कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.

Rosatom नंतर सांगितले की, साइटवरील कॅन्टीनजवळ ड्रोन आदळल्यामुळे तीन व्यक्तींना दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

IAEA चे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी रशिया आणि युक्रेनला "अण्वस्त्रांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या कृतींपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

युरोपमधील सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र असलेल्या, झापोरिझ्झिया अणुऊर्जा केंद्रात सोव्हिएत युनियनने डिझाइन केलेले सहा युरेनियम-२३५ वॉटर-कूल्ड आणि वॉटर-मॉडरेटेड VVER-1000 V-320 अणुभट्ट्या आहेत.

प्लांटच्या प्रशासनानुसार, अणुभट्ट्या क्रमांक एक, दोन, पाच आणि सहा बंद अवस्थेत आहेत, अणुभट्टी क्रमांक तीन देखभालीसाठी बंद आहे आणि अणुभट्टी क्रमांक चार "हॉट शटडाउन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आहे.

रशिया आणि युक्रेन या दोघांनी वारंवार एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे आणि त्यामुळे अणु अपघाताची शक्यता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT