Narendra Modi Vladimir Putin
Narendra Modi Vladimir Putin Narendra Modi Vladimir Putin
ग्लोबल

PM मोदींनी पुतिन यांची समजूत घालावी; युक्रेनच्या मंत्र्याची भारताला विनंती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : युक्रेनने रशियासोबत सुरु असलेलं युद्ध लवकरात लवकर थांबवलं जावं, यासाठी पुन्हा एकदा भारताकडे विनंती केली आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची समजूत घालण्यासाठी आणि त्यांच्याशी बातचित सुरु ठेवण्याचं आवाहन केलं आहे. दिमित्रो कुलेबा यांनी म्हटलंय की, भारतामधील रशियन दुतावासावर दबाव तयार करुन रशियाला युद्ध थांबवण्याबाबतची मागणी केली जाऊ शकते. (Russia-Ukraine War)

युक्रेन फक्त आणि फक्त या कारणास्तव लढत आहे कारण आमच्या हल्ला करण्यात आला आणि आम्हाला फक्त आपल्या जमिनीचे संरक्षण करायचे आहे. पुतिन आमच्या अस्तित्वाचा अधिकार मान्य करत नाहीयेत. भारतासोबत विशेष संबंध असणारे सर्वच देशांचे प्रमुख पंतप्रधान मोदींना विनंती करु शकतात की त्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी संवाद साधणं सुरु ठेवावं आणि त्यांना समजवावं की हे युद्ध कुणाच्याच हिताचं नाहीये. रशियाचे बहुतांश लोकदेखील या युद्धामध्ये कसलंही स्वारस्य ठेवत नाहीत.

त्यांनी पुढे म्हटलंय की, 30 वर्षांपासून युक्रेन हे अफ्रिका, आशियामधील हजारो विद्यार्थ्यांसाठी एक स्वागत योग्य घर राहिलेलं आहे. या परदेशातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी म्हणून युक्रेनने अनेक ट्रेन्सची व्यवस्था केली, हॉटलाईन स्थापन केली, दुतावासांसोबत काम केलं, युक्रेन सरकार आपल्या बाजूने पूर्णपणे प्रयत्न केले आहेत. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी असा दावा केला की, रशिया त्या सर्व देशांची 'सहानुभूती जिंकण्याचा' प्रयत्न करत आहे, ज्यांचे नागरिक युक्रेनमध्ये आहेत. पुढे त्यांनी म्हटलंय की, मी भारत, चीन आणि नायझेरियाच्या सरकारांना सांगू इच्छितो की त्यांनी रशियाला फायरिंग थांवण्यास आणि नागरिकांना बाहेर पडण्याची विनंती करावी.

कुलेबा यांनी म्हटलंय की, भारतासहित सर्व देश जे रशियासोबत विशेष संबंध ठेवून आहेत, त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विनंती करावी हे युद्ध सर्वांच्या सर्वप्रकारच्या हितांच्या विरोधात आहे. या युद्धाचा अंत सर्वच देशांच्या सर्वोत्त हिताच्या बाजूनेच आहे. भारत हा युक्रेनमधील कृषी उत्पादनांच्या ग्राहकांपैकी महत्त्वाचा ग्राहक आहे. जर हे युद्ध असंच सुरु राहिलं तर नव्याने पीक घेणं अवघड होऊन बसेल. त्यामुळेच जगाच्या आणि भारतीय खाद्य सुरक्षेच्या दृष्टीनेही हे युद्ध थांबवणं सर्वोत्तम हिताचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT