Ukraine Russia war bodies of Russian soldiers pile up at morgue in Belarus says report  Google
ग्लोबल

बेलारुसमध्ये रशियन सैनिकांच्या प्रेतांचा खच; कुजल्याने येतेय दुर्गंधी

सकाळ डिजिटल टीम

रशिया युक्रेन (Russia Ukraine war) यांच्यात गेल्या दोन आठवड्यांपासून युद्ध सुरू आहे. या युध्दात युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत तर शेकडो रशियन सैनिकांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या दरम्यान रशियातील बीबीसीच्या रिपोर्टनुसार, बेलारुसच्या मोझीर (Mozyr) शहरातील एका शवागारात रशियन सैनिकांच्या शेकडो मृतदेहांचा खच पडला आहे.

रिपोर्टनुसार, दक्षिण बेलारूसमधील रुग्णालये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जीव गमावलेल्या रशियन सैनिकांच्या मृतदेहांनी भरून गेले आहेत, असे बेलारुस आणि युक्रेनमधील स्वतंत्र माध्यमांनी वृत्त दिलंय. NEXTA मीडियाच्या हवाल्याने दिलेल्या बीबीसीच्या रिपोर्टमध्ये, मोझीर येथील शवागारातील सैनिकांचे मृतदेह रेफ्रिजरेटरमध्ये नेले जात नसून ते साधारण 5 बाय 5 फूट खोल्यांमध्ये ठेवले जात आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

"ते कुजतायत, त्यांना दुर्गंधी येतेय, मग ते मृतदेह कुठेतरी नेले जातात. सैनिक स्वतः हे काम करतात. यावर पाहारा बसवला आहे. फक्त विभागाच्या प्रमुखांना तेथे प्रवेश आहे", असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. बीबीसीच्या सूत्राने पुढे सांगितले की, "तिथे किती मृतदेह आहेत याबद्दल कोणालाच माहीत नाही, पण जे काही घडत आहे ते पाहून सगळेच घाबरले आहेत. डॉक्टरांना वाटते की, तेथे फिरती स्मशानभूमी आहे किंवा त्यांनी त्यांना कुठेतरी पुरले आहे."

रशिया-युक्रेन युद्ध

या युध्दाची झळ सामान्य नागरिकांना देखील बसत आहे. रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केले आणि देशभर हल्ले सुरू केले. युद्धामुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक निर्वासित झाले असून हजारो लोक घर सोडून गेले आहेत. तसेच शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान युक्रेनने दावा केला आहे की या युद्धात आतापर्यंत 12,000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा दिवाळी सेलिब्रेशनसाठी केलं 'मॅचिंग मॅचिंग'; रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण

Diwali Celebration : वसई विरार मध्ये शिवरायांच्या किल्ल्याचे दर्शन; ठीक ठिकाणी उभारण्यात आले आहेत इतिहास कालीन किल्ले

Karad News : कऱ्हाड दक्षिणमधील ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील यांचे निधन

Balipratipada and Padwa 2025: बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा एकाच दिवशी का साजरा करतात? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Fursungi Nagar Parishad Election : फुरसुंगी नगरपरिषद निवडणुकीसाठी महापालिकेचे ३५ कर्मचारी नियुक्त

SCROLL FOR NEXT