Ukraine and Russia War Updates
Ukraine and Russia War Updates Sakal
ग्लोबल

Ukraine-Russia War : संयम बाळगा, चर्चा करा

सकाळ वृत्तसेवा

बीजिंग: रशियाच्या आक्रमकपणाचा अनेक देशांनी निषेध केला असताना चीनने रशियाचा बचाव करणारी भूमिका घेतली. इतर देशांनी संयम बाळगावा आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ देऊ नये, असे आवाहन चीनने केले आहे. चीन हा रशियाचा जवळचा मित्र देश समजला जातो.

रशियाने हल्ला केल्यानंतर चीन सरकारची प्रतिक्रिया विचारली असता परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी, युक्रेनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे सांगितले. चुनयिंग यांनी रशियाचा निषेध न करता इतर सर्व देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. ‘सध्याची परिस्थिती पाहता सर्व देशांनी आक्रमकपणा टाळायला हवा. अन्यथा तणावात भर पडू शकते.

सर्व देशांच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेबाबत चीनची भूमिका कायम आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये झालेल्या ठरावांची सर्वांनीच अंमलबजावणी करायला हवी,’ असेही त्यांनी सांगितले. चीनचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत झँग जुन यांनीही भूमिका मांडली. ‘युक्रेनच्या प्रश्‍नाची मुळे ही ऐतिहासिक आणि वर्तमानात घडलेल्या घडामोडींमध्ये रुजलेली आहेत. या दोन्ही काळांतील घडामोडींचा परिणाम म्हणूनच वाद निर्माण झाला आहे,’ असे ते या वेळी म्हणाले.

शांततेची दारे खुली ठेवावीत

युक्रेनची समस्या सोडविण्यासाठी शांततेची दारे खुलीच ठेवावीत, असे आवाहन चीनने केले आहे. राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्यालाच सर्वांनी प्रोत्साहन द्यायला हवे. तसेच, युक्रेनचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करताना चीन आणि इतर देशांच्या अधिकारांचा अधिक्षेप होणार नाही, याची अमेरिकेने काळजी घ्यावी, असा इशाराही चीनने दिला आहे. रशियावर टाकलेल्या निर्बंधांचाही चीनने निषेध केला. निर्बंध टाकून प्रश्‍न सुटणार नाहीत, हे निर्बंध बेकायदा आहेत, अशी भूमिका चीनने घेतली आहे.

मानवतेचे स्मरण करत पुतीन यांनी आपले सैन्य माघारी न्यावे. युरोपात युद्धाला सुरुवात करू नये. या युद्धाचे केवळ युक्रेनवरच दुष्परिणाम होणार नाहीत आणि रशियालाच केवळ फटका बसणार नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेचीही मोठ्या प्रमाणावर हानी होणार आहे. या युद्धाची कोणतीही गरज नाही.

- अँटोनिओ गुटेरेस,सरचिटणीस, संयुक्त राष्ट्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT