university of nebraska lincoln claims coronavirus can spread in air 
ग्लोबल

रुग्णाच्या मृत्यूनंतरही मरत नाही कोरोना विषाणू...

वृत्तसंस्था

नेब्रास्का (अमेरिका) : जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस या विषाणूची लागण झाल्याची आणि मृतांची संख्या वाढत आहे. या आजारावर अद्याप उपाय शोधला आलेला नाही. पण, एखाद्या रुग्णाच्या मृत्यूनंतरही कोरणाचे विषाणू मरत नाहीत, असा खुलासा तज्ज्ञांनी केला आहे.

चीनमधून व्हायरल झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात तब्बल 10 लाख जणांना लागण झाली आहे. मात्र, अद्याप कोरोनावर ठोस उपाय कोणालाही शोधता आलेले नाही. यातच आता तज्ज्ञांनी कोरोना विषाणू हवेत फिरता राहतो, असा खुलासा केला आहे. याचा अर्थ कोरोनाबाधित रुग्ण एखाद्या खोलीत असेल, तर त्या जागेत काही काळ कोरोनाचा विषाणू हवेत राहतो. अमेरिकेच्या नेब्रास्का विद्यापीठाच्या संशोधकांनी हवेमध्ये कोरोनाच्या अस्तित्वाचा अभ्यास केला होता, असे वृत्त डेली मेलने दिले आहे.

नेब्रास्का विद्यापीठातील संशोधकांच्या अभ्यासानुसार, 'कोरोनाबाधित रूग्ण एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी गेल्यानंतर कोरोना विषाणू अनेक तास वातावरणात राहू शकतो. रुग्णालयातून रुग्णाला त्याला घरी सोडल्यानंतर किंवा त्याच्या मृत्यूनंतर सभोवतालच्या परिसरात कोरोनाचा विषाणू जीवंत राहतो. अनेक ठिकाणी उपचार करणार्‍या डॉक्टरांनाही संसर्ग झाला असून, जगभरात या रोगामुळे 300 हून अधिक डॉक्टर मरण पावले आहेत.'

दरम्यान, जगभरातील वैद्यकीय शास्त्रज्ञ अद्याप संक्रमित व्यक्तींमध्ये हवेच्या किंवा कोणत्याही पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यामुळे किती रूग्णांवर परिणाम झाले आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात किती रुग्ण आले याची कोणताही माहिती उपलब्ध करुन दिली नाही. नेब्रास्का विद्यापीठाच्या अभ्यासात 11 रूग्णांच्या खोल्यांचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांमधून कोरोना खोलीच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी हवेत दिसतो. विद्यापीठातील तज्ज्ञांचे आणि संक्रमित आजाराच्या अभ्यासाचे नेतृत्व करणारे जेम्स लॉलर म्हणाले की, 'आम्हाला जे निकाल मिळाले आहेत त्यामुळे आमच्या संशयाचे निराकारण झाले आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT