2611 
ग्लोबल

'26/11' तील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना अमेरिकेकडून 50 लाख डॉलरचं बक्षिस

सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : मुंबईमध्ये 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यांला नुकतेच 12 वर्षे पूर्ण झाली. भारतावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत नृशंस असा हल्ला होता. या हल्ल्यात 170 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते तर 300  हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्याला जबाबदार असलेला एकमेव जिवंत दहशतवादी कसाबला पकडून त्याचा गुन्हा जगासमोर सिद्ध करत त्याला फाशी देण्यात आली होती. या  प्रकरणात आता अमेरिकेच्या सरकारकडून लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीरबाबत माहिती देणाऱ्याला 50 लाख डॉलरचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. 

मात्र, पाकिस्तानने प्रतिबंधित केलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या 19 दहशतवाद्यांनी केलेल्या या कारवाईबद्दल मोस्ट वाँटेड टेररीस्टच्या यादीत त्यांना ठेवलं गेलं असलं तरीही त्यांना पकडण्यासाठी काही विशेष प्रयत्न मात्र केले गेले नाहीयेत. तसेच त्या 7 दहशतवाद्यांना शिक्षा करण्यासाठी काही विशेष प्रयत्न केला गेला. भारत देखील या दहशतवाद्याला शोधण्यासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न करतो आहे. 

अत्यंत नियोजनबद्ध रितीने हा हल्ला घडवून आणण्यात आला होता.
मुंबईमधील सीएसटी स्टेशन, ताज हॉटेल, नरीमन हाउस, लियोपोल्ड कॅफे या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले होते. दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांचे मनसुबे 'नाकाम' करण्यासाठी पोलिस एनएसजी जवानांना 3 दिवस संघर्ष करावा लागला होता.  या दहशतवादी हल्ल्यामध्ये काही जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. एटीएस प्रमुख हेमंत करकरे, एनकाउंटर स्पेशलिस्ट  अशी ओळख असलेले  विजय सालसकर, एसीपी अशोक कामटे आणि  तुकाराम ओंबाळे वीरांनी प्राणाची आहुती दिली होती. 

 या नृशंस हल्ल्यात निष्पाप लोक मारले गेले होते. हा  हल्ला होऊन 
मागच्या 26 नोव्हेंबरला 12 वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशी एकीकडे जग या हल्ल्याचा निषेध करत मृतांना श्रद्धांजली वाहत होते तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये राजकारणाचा मुखवटा घातलेल्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेने मुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्या 10 दहशतवाद्यांसाठी आज एक विशेष प्रार्थना सभा ठेवली होती, अशी बातमी आली  होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

SCROLL FOR NEXT