US-China relations at a low as blame-shifting sets back war against virus 
ग्लोबल

Coronavirus : चीन-अमेरिकेत संघर्ष; ट्रम्प यांनी दिला 'हा' इशारा

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोनामुळे चीन आणि अमेरिकेत संबंध बिघडताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसोबत असणारा व्यापार करार तोडण्याचा इशारा दिला आहे.

ट्रम्प म्हणाले की, त्यांच्यापेक्षा कोणीही चीनप्रती कठोर असू शकत नाही. विशेष म्हणजे चीनमधून उद्भवणार्‍या कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात दोन्ही देशांच्या नेत्यांकडून वक्तव्य होत आहेत. अमेरिका कोरोनाचा व्हायरस चीनमधील कोणत्या तरी प्रयोगशाळेतून सोडण्यात आला आहे का याबद्दल शंका उपस्थित होत आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी अनेकदा याला 'चिनी व्हायरस' म्हटले आहे.

Coronavirus : कोरोनावरुन केंद्र आणि प. बंगाल सरकारमध्ये पुन्हा जुंपली
चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर यावर्षी जानेवारीत स्वाक्षरी झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून ट्रेड वॉरची कटुता विसरून दोन्ही देशांनी या करारास सहमती दर्शविली होती. दोन वर्षांपासून दोन्ही देशांमधील ट्रेडवॉरमुळे जगातील शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. या करारामध्ये असे म्हटले गेले होते की, चीन 200 अब्ज डॉलर्सची अमेरिकन उत्पादने खरेदी करेल. पण यूएस-चाइना इकोनॉमिक अँड सिक्योरिटी रीव्यू कमीशनने आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, 'चीन यामध्ये एक नवीन अट टाकू शकतो की, नैसर्गिक संकट किंवा असामान्य परिस्थितीमध्ये पुन्हा चर्चा केली जाईल.

Coronavirus : औवेसींनी पहिल्यांदाच केले मोदी सरकारचे कौतुक; म्हणाले...

दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूची 82,788 लोकांना लागण झाली आणि 4632 लोकांचा मृत्यू झाला. तर अमेरिकेत 8,24,600 जणांना कोरोनाची लागण झाली असून 45 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वात मोठा परिणाम अमेरिकेवर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT