Joe Biden - Narendra Modi Team eSakal
ग्लोबल

रशिया तुमच्या मदतीला धावून येईल ही अपेक्षा ठेवू नका, अमेरिकेचा भारताला इशारा

'जगाला युद्धात ढकलणाऱ्या रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचे कोणत्याही देशाकडून उल्लंघन होऊ नये'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर आयात वाढ केल्याची माहिती जाणून घेण्यास अमेरिका (America) उत्सुक नाही. युक्रेनवरील हल्ले सुरु झाल्यानंतर रशियावर जगभरातून विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचे उल्लंघन करु नये, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलिप सिंग (Daleep Singh) यांनी दिला आहे. सिंग सध्या भारताच्या (India) दौऱ्यावर आहेत. रशियावर अमेरिकेने घातलेल्या आर्थिक निर्बंधांमागे महत्त्वाची भूमिका दलिप सिंग यांनी बजावली आहे. ते भारतीय वंशाचे असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारमध्ये त्यांना विशेष स्थान आहे. युक्रेन (Ukraine) - रशिया दरम्यान सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताबरोबर चर्चा करण्यासाठी दौऱ्यावर ते आले आहेत. या प्रसंगी सिंग प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (US Deputy National Security Advisor Daleep Singh Warn India, Don't Expect From Russia, If China)

ते म्हणाले, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केल्यास रशिया तुमची बाजू घेईल, अशी मूळीच अपेक्षा ठेवू नका. कारण रशिया (Russia) आणि चीन हे चांगले मित्र झाले आहेत. जगाला युद्धात ढकलणाऱ्या रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचे कोणत्याही देशाकडून उल्लंघन होऊ नये, असे आम्हाला वाटते.

भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये काही विपरित घडलेले नाही. मात्र जागतिक शांतता आणि सुरक्षिततेच्या पायाभूत तत्त्वे अबाधित राहावे यासाठी प्रामाणिक चर्चा करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे सिंग म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil: ''त्या' बैठकीला सुनील तटकरे नव्हते, अजितदादांची अंतिम इच्छा..'', पक्ष विलीनीकरणाबाबत जयंत पाटलांनी सांगितली नवी माहिती

Budget 2026 : 1997-98 चं ‘ड्रीम बजेट’! पी. चिदंबरम यांच्या निर्णयांनी भारताची अर्थव्यवस्था कशी बदलली?

RSS च्या शताब्दीनिमित्त ‘शतक : संघाचे 100 वर्ष’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : थोड्याच वेळात सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Nashik Municipal Corporation : स्थायी समिती सदस्यत्वासाठी चुरस; कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या नाशिक मनपाचे गणित

SCROLL FOR NEXT