donald_20trump_20and_20joe_20biden_0.jpg 
ग्लोबल

US Election 2020: ट्रम्प पराभवाच्या दिशेने ? सर्वेक्षणात बायडेन यांना आघाडी

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन- अमेरिकेत 3 नोव्हेंबर राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी आलेल्या एका सर्वेक्षणात विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सर्व्हेनुसार या निवडणुकीत सर्वात महत्त्वाच्या चार राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा आघाडीवर दिसत आहेत. एका पोलनुसार बायडेन यांना राष्ट्रीय स्तरावर ट्रम्प यांच्यापेक्षा 10 टक्क्यांनी आघाडी मिळाल्याचे दिसते. बायडेन यांच्याकडे ट्रम्प यांच्या तुलनेत 270 इलेक्टोरेल मतांचे विजयी लक्ष्य गाठण्याची शक्यता जास्त दिसत आहे. 

'शिन्हुआ' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एनबीसी न्यूज आणि वॉल स्ट्रीट जर्नलच्या सर्वेक्षणात दाखवलेल्या राष्ट्रीय नोंदणीकृत मतदारांमध्ये ट्रम्प यांना 42 टक्के लोकांचे समरथन मिळताना दिसत आहे. तर बायडेन यांच्या बाजूने 52 टक्के नागरिक दिसत आहेत. 

अंतिम निवडणूकपूर्व सर्वेक्षणात 12 जागांमध्ये अ‍ॅरिझोना, फ्लोरिडा, जॉर्जिया, आयोवा, मेन, मिशिगन, मिनिसोटा, उत्तर कॅरोलिना, न्यू हॅम्पशायर, नेवाडा, पेन्सिल्वेनिया आणि विस्कॉन्सिनमध्ये बायडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा 6 गुणांनी पुढे होते. म्हणजेच तिथे बायडेन यांना 51 टक्के आणि ट्रम्प यांना 45 टक्के मते मिळताना दिसतात. 

या सर्वेक्षणानुसार 2016 च्या निवडणुकीत सहभागी न झालेले लोक आणि यावेळी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या बहुतांश मतदारांचा पाठिंबा डेमोक्रॅटिकला मिळू शकतो. बायडेन हे डेमोक्रॅटिकचे उमेदवार आहेत. यापूर्वी 'द टाइम्स'ने केलेल्या पोलमध्ये बायडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा पुढे होते. 

निवडणुकीच्या पूर्वी हे अंतिम सर्वेक्षण 29 ते 31 ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले होते. त्यानुसार यामध्ये बायडेन यांच्या बाजूने जे मतदार आहेत, त्यापैकी कृष्णवर्णीय मतदार (87 टक्के ते 5 टक्के), 18 ते 34 वर्ष वयाचे युवा मतदार (60 टक्के ते 32 टक्के), ज्येष्ठ नागरिक (58 टक्के ते  35 टक्के), महिला (57 टक्के ते 37 टक्के) यांचा समावेश आहे. 

गेल्या अनेक दशकांपासून रिपब्लिकनचा गड असलेल्या टेक्सासमध्ये बदल होताना दिसत आहे. बिडेन आणि कमला हॅरिसच्या जोडीने आघाडी घेतली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT