Biden-Trump 
ग्लोबल

निवडणुकीत मतांची चोरी वा घोटाळा नाही; US निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्रध्यक्ष बनण्याची स्वप्ने पाहत होते. मात्र त्यांची ही स्वप्ने डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांनी धुळीस मिळवली आहेत. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी पराभव केला आहे. मतमोजणी दरम्यानच आपला पराभव होत असल्याचा अंदाज आल्यावरच डोनाल्ड ट्रम्प यांनी घोटाळा झाल्या आरोप करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, आता अधिकाऱ्यांनी या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

अमेरिकेच्या संघ आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलंय की  अलिकडेच झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारची गडबड झाल्याचा पुरावा अथवा साक्ष उपलब्ध नाहीये. असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही ज्याआधारे हे म्हणता येईल की निवडणुकीत मतांची चोरी, फसवणूक अथवा मतदानाची प्रक्रिया भ्रष्ट झाली आहे. देशभरात सुरक्षित आणि पारदर्शकरित्या मतदानाची प्रक्रिया अधिकाऱ्यांद्वारे पार पाडली गेलीय. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोटाळ्याच्या केलेल्या आरोपांचे खंडन या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी घोटाळा केल्याचा तसेच मतांची चोरी केल्याचा आरोप केला होता. 

निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या एका वक्तव्यात म्हटलं की, 3 नोव्हेंबर रोजी झालेली निवडणूक ही आतापर्यंतच्या इतिहासातील एक सर्वांत सुरक्षित निवडणूक राहिली आहे. त्यांनी वक्तव्यात म्हटलंय की, आम्हाला कल्पना आहे की निवडणूक प्रक्रियेबाबत चुकीचे दावे केले गेले आहेत मात्र आम्ही तुम्हाला आश्वस्त करु इच्छितो की, आम्हाला आपल्या निवडणुकीच्या सुरक्षेवर आणि अखंडतेवर अधिक विश्वास आहे आणि असायलाही हवा. 

अमेरिकेच्या हाय व्होल्टेज निवडणुकीचा निकाल अत्यंत अटीतटीचा लागला. या निडवणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी 217 इलेक्टोरल व्होट्स जिंकले तर जो बायडेन यांनी 290 इलेक्टोरल व्होट्स जिंकले. आपला पराभव होतोय हे लक्षात आल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी थैयथैय्याट केला होता. अद्यापही त्यांनी आपला पराभव मान्य केलेला नाहीये. या निवडणुकीचा निकाल अद्याप औपचारिकरित्या जाहिर झालेला नाहीये. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT