joe biden. 
ग्लोबल

अमेरिकेची नव्या कायद्याला मंजुरी; 5 लाखांपेक्षा अधिक भारतीयांचे स्वप्न होणार पूर्ण

सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या सरकारने एक विधेयक मंजूर केले आहे. यामुळे 5 लाखांपेक्षा अधिक भारतीयांच्या नागरिकत्वाचा मार्ग मोकळा झालाय.अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हने यासंबंधी कायदा मंजूर केला. यानुसार, लहानपणापासून अवैध पद्धतीने अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळण्यास मदत होणार आहे. 'अमेरिकन ड्रीम अँड प्रोमिस अॅक्ट' नावाने मजुर झालेल्या या कायद्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या 5 लाखांपेक्षा अधिक भारतीयांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत.  हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हने गुरुवारी 'अमेरिकन ड्रीम अँड प्रोमिस अॅक्ट' कायदा 228-197 मतांच्या फरकाने मंजूर केला. तसेच पुढील प्रक्रियेसाठी तो सीनेटकडे पाठवण्यात आला आहे. 

कायद्यामुळे अशा लोकांनाही नागरिकत्व मिळण्यास मदत होईल, ज्यांना कायदेशीर निगराणीखाली राहावे लागत आहे आणि त्यांना आपल्या देशात परत पाठवण्याची तयारी सुरु आहे. असं सांगितलं जातंय की, या कायद्यामुळे 5 लाखांपेक्षा अधिक भारतीय नागरिकांसोबत 1 कोटी लोकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकेल, ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत. 

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या कायद्याचे समर्थन करताना म्हटलं की, काँग्रेसनेही या विधेयकाला मंजुरी दिली, तर 1.1 कोटी लोकांना देशाचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. अमेरिकेमध्ये कोणत्याही कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या लोकांची संख्या 1 कोटी 10 लाख आहे. अशा लोकांना बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहिल्याप्रकरणी त्यांच्या मुळ देशात जायला लागू शकते. हा नवा कायदा सीनेटमध्ये मंजुरी झाल्यास याचा परिणाम 5 लाखांपेक्षा अधिक भारतीयांवर पडणार आहे.  

आपल्या आई-वडिलांसोबत अमेरिकेत आलेल्या मुलांची संख्या मोठी आहे. त्यांनी त्यानंतर अमेरिका सोडलेले नाही. असे जवळपास 1.1 कोटी लोक अमेरिकेत राहत असून त्यांना अप्रवासी म्हटलं जातं. अशा लोकांना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी बायडेन सरकारने संसदेत विधेयक आणले. हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हमध्ये या कायद्याला मंजुरी मिळाली आहे. आता सीनेटमध्येही या विधेयकाला मंजुरी मिळाल्यास गेल्या अनेक वर्षापासून अमेरिकेत राहणाऱ्या आणि नाहरिकत्व मिळण्याची आशा ठेवणाऱ्या लोकांना दिलासा मिळणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Alert: सोन्याचे भाव पुन्हा कोसळणार? वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात धक्कादायक संकेत

पुण्यात खळबळ! विद्यापीठात बनावट डिग्रीचं रॅकेट? रिक्षाचालकाने उघड केलं गंभीर प्रकरण

Bank Holidays: ग्राहकांनो, लक्ष द्या! ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँकांना सुट्ट्या; RBI ने जाहीर केलेल्या 'या' तारखा नीट लक्षात ठेवा

'मामाच्या गोव्याला जाऊया'मध्ये मकरंद अनासपुरेंची धमाकेदार एन्ट्री; एकाच संवादात गुंफली १५ चित्रपटांची नावं

Latest Live Updates Marathi : 'पेपरफुटी हा आता पॅटर्न झालाय', अभिषेक बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT