ग्लोबल

जो बायडेन यांची पत्रकाराला शिवीगाळ; महागाईवर प्रश्न विचारताच संतापले

प्रश्न विचारल्यावर ते संतापले अन् माईक सुरुच असल्याचं भान विसरले

सुधीर काकडे

एका पत्रकाराच्या प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) इतके भडकले की, त्यांनी सर्वांसमोरच त्यांना माईकवर शिवीगाळ केली. या पत्रकाराचा दोष एवढाच होता की, त्यानं देशातील वाढलेल्या महागाईवर बायडेन यांना प्रश्न विचारला होता. सोमवारी यूएस न्यूज नेटवर्कच्या पत्रकारांनी बायडेन यांना प्रश्न विचारल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. (Joe Biden Calls Journalist stupid...)

फॉक्स न्यूजचे पत्रकार पीटर डॅकी यांनी बायडेन यांना देशातील वाढत्या महागाईबाबत प्रश्न विचारला. देशातील वाढती महागाई हे तुमचं अपयश तर नाही ना? असा सवाल त्यांनी केला होता. यावर उत्तर देण्याऐवजी बायडेन थेट संतापले. संताप एवढा होता की, माईक चालू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही अन् त्यांनी थेट पत्रकाराला शिवी दिली. ते रागाच्या भरात पत्रकाराला "What a stupid son of a bitch." असं म्हटले. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये वाढ झाली असून, त्यात आता राष्ट्राध्यक्ष बिडेन यांचा हा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी बिडेन यांनी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली होती. गेल्या आठवड्यात बायडेन यांनी फॉक्स न्यूजच्या महिला पत्रकारावरही असाच संताप व्यक्त केला होता. त्यावेळी या महिला पत्रकाराने त्यांना रशियाशी संबंधित प्रश्न विचारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा, ठरलेल्या वेळेत उडणार धुरळा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

विश्वविजेता भारतीय संघ ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत बलाढ्य संघाला भिडणार; वर्ल्ड कपची तयारी, पण स्मृती मानधना नाही खेळणार?

Mumbai Crime: २० हप्त्यांचे आमिष, २१व्या महिन्यात फसवणूक! वनक्लिककडून गुंतवणूकदारांच्या लाखो रुपयांचा खेळखंडोबा, प्रकरण काय ?

Latest Marathi News Live Update : "मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली... - आशिष देशमुखांची विरोधकांवर टिका

Processed Food Side Effects: तुम्ही पदार्थ खाता की पदार्थ तुम्हाला खातो? प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमुळे स्थूलता,मधुमेह, हृदयरोगाचा धोका

SCROLL FOR NEXT