Joe-Biden 
ग्लोबल

चीनच्या आव्हानांचा मुकाबला करणार; अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा इशारा

पीटीआय

वॉशिंग्टन - ‘‘चीनकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा थेट सामना करण्यास अमेरिका तयार आहे. पण त्याचबरोबर देशहितासाठी चीनबरोबर काम करण्यासही अमेरिकेला अजिबात संकोच वाटणार नाही,’’ असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची स्पष्ट करीत चीनला इशारा दिला. 

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणासंबधी बायडेन यांचे गुरुवारी (ता.४) पहिले भाषण झाले. ‘फॉगी बॉटम’ मुख्यालयात परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसमोर बोलताना त्यांनी परराष्ट्रसंबंधांबाबच्या सर्व शंका दूर करून प्रभावी आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत अमेरिकेच्या जनतेत विश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न संपूर्ण भाषणात केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळात विस्कळित झालेल्या परराष्ट्र धोरणानंतर आता देशात नवे युग अवतरेल, अशी ग्वाही देत जागतिक व्यासपीठावर अमेरिकेचे पुनरागमन झाले आहे, असे बायडेन यांनी जाहीर केले. त्याच वेळी त्यांनी चीन व रशियालाही इशारा दिला.

चीनवर रोख साधत ते म्हणाले की, चीनकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा थेट सामना करण्यास अमेरिका तयार आहे. पण त्याचबरोबर देशहितासाठी चीनबरोबर काम करण्यासही अजिबात संकोच वाटणार नाही. चीनकडून होणाऱ्या आर्थिक शोषणाचा मुकाबला आपण करू. तसेच मानवाधिकार, बौद्धिक संपत्ती आणि जागतिक सत्तांवर होणारे चीनी हल्ले कमी करण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही बायडेन यांनी दिला. 

रशियाला आव्हान
अमेरिकेतील लोकशाहीला धक्का देण्याचा आणि नुकसान पोचविण्याचे रशियाचे मनसुबे उधळून लावण्याचा इशारा बायडेन यांनी दिला. ‘‘रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना माझ्या आधीच्या अध्यक्षांपेक्षा वेगळ्या भाषेत सांगू इच्छितो की, रशियाची आक्रमक भूमिका, अमेरिकेतील निवडणुकीत हस्तक्षेप, सायबर हल्ला आणि त्यांच्‍या लोकांवर विषाचा प्रयोग करणे अशा गोष्टी अमेरिका खपवून घेणार नाही, असा थेट इशारा बायडेन यांनी दिला. 

चीनबद्दल धोरण
चीनसंबंधी बायडेन प्रशासनाच्या धोरणाची झलक या भाषणातून मिळाली. ते म्हणाले, ‘‘अमेरिकेच्या हिताचा मुद्दा येतो, तेव्हा आम्ही चीनच्या साथीत काम करण्यासही आम्ही तयार आहोत. आम्ही आमचे सहकारी किंवा भागीदारांबरोबर काम करून आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये अमेरिकेच्या भूमिकेला नवे रूप देऊ. आमची विश्‍वासार्हता आणि नैतिक अधिकार पुन्हा मिळवीत देशांतर्गत स्थिती अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करू.’’

‘गोल्डमन सॅच’ या अमेरिकन वित्त पुरवठार कंपनीला चीनची प्रवेशद्वारे खुली करणे याला अमेरिकेचे प्राधान्य नसून चीनकडून व्यापारात होणारे आर्थिक शोषणाचा निपटारा करण्यास आहे. याचा परिणाम अमेरिकी नागरिकांच्या नोकऱ्या आणि कर्मचाऱ्यांवर होत आहे. 
- जेक सुलीवान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, अमेरिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींचा १ तासाचा कार्यक्रम, रस्ता ७ दिवसांसाठी बंद का? उच्च न्यायालयात याचिका दाखल

Sangli Gool Bazaar: तुकाराम मुंढेंच्या कारवाईची धास्ती! सांगलीचा गूळ बाजार १२ दिवसांपासून ठप्प, कोट्यवधींची उलाढाल बंद, कर्नाटकातून आवकही थांबली

Latest Marathi News Live Update : शिवसेनेतील फुटीमागे चुकीच्या माहितीचे राजकारण; आमदार माऊली कटके यांचा दावा

IND vs AFG 2nd ODI: नितीश कुमार रेड्डीची निवड का केली नाही? BCCI चे चिंता वाढवणारे अपडेट्स; नवा ओपनर दुसऱ्या षटकात OUT

Mumbai-Goa Highway : चिपळूणकरांना मोठा दिलासा! मुंबई-गोवा हायवेवर यंदा पाणी तुंबणार नाही; प्रशासनानं उचललं 'हे' पाऊल, अपघाताच्या धोक्यांनाही 'ब्रेक'

SCROLL FOR NEXT