US Reaction on Beijing Winter Olympics 2022
US Reaction on Beijing Winter Olympics 2022 Team eSakal
ग्लोबल

'गलवान'वरून अमेरिकेचा चीनला इशारा; मित्रराष्ट्राच्या बाजूने उभा राहणार

सुधीर काकडे

बीजिंग हिवाळी ऑलिंपिकमध्ये (Beijing Winter Olympics 2022) मशालवाहक म्हणून, चीनने गलवान चकमकीमधील (Galwan Conflict) PLA सैनिकाला सहभागी करून घेतलं. भारतानंही (India) या ऑलिंपिकमध्ये सहभाग घेतला नसून, जगभरातून या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटताना दिसत आहेत. त्यातच आता अमेरिकेनं (America) पुन्हा गलवान प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस (US State Dept Spox Ned Price) यांनी, जेव्हा मुद्दा भारत-चीन सीमा वादाचा (Galwan Disputes) असेल तेव्हा आम्ही शांततापूर्ण संवादासाठी प्रयत्न करू असं स्पष्ट केलं आहे.

नेड प्राईस यांनी याबद्दल बोलताना चीनकडून शेजाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न सुरु असलेल्या प्रयत्नांबद्दल चिंता व्यक्त केली. तसंच इंडो-पॅसिफिकमध्ये समृद्धी, सुरक्षा वाढवण्यासाठी आम्ही मित्र राष्ट्रांसोबत उभे आहोत असं म्हणत अमेरिकेनं चीनला अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे. युक्रेनच्या मुद्यावरून अमेरिका आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा अमेरिका-भारत संबंधांवर परिणाम झाला का? असं विचारलं असता, नेड प्राइस यांनी असं काहीही नसल्याचं स्पष्ट केलं. आमचे भारताशी असलेले संबंध अतिशय चांगले असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, यंदाच्या बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या रिलेदरम्यान गलवान घटनेत जखमी चीनी कमांडरलाच चीननं मशालवाहक म्हणून जबाबदारी सोपवल्यामुळे भारताकडून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत हिंसक चकमक झाली होती. त्यामध्ये चीनचे रेजिमेंट कमांडर क्यूई फैबाओ हे जखमी झाले होते. भारताला मुद्दाम खिजवण्यासाठी चीनने फैबाओ यांनाच यंदाच्या ऑलिम्पिक रिलेमध्ये मशालवाहक म्हणून त्यांच्या हाती मशाल सोपवली आहे. त्यामुळे हिवाळी ऑलम्पिकवर 'सांकेतिक' राजकीय बहिष्काराची घोषणा भारताने केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cut Outs Removed: शिवाजी पार्क परिसरातील मोदी-शहांचे कटआऊट्स हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई

CSEET Result : ICSI कडून CSEET 2024 चा निकाल जाहीर; 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करुन स्कोअरकार्ड डाऊनलोड करा

Share Market Closing: निफ्टी 22400 पार.. चढ-उतारानंतर शेअर मार्केट वाढीसह बंद, जाणून घ्या कशी आहे शेअर्सची स्थिती!

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : श्रीकांत शिंदेंच्या संकल्पपत्राचे अनावरण

SCROLL FOR NEXT