vaccin 
ग्लोबल

मॉडर्नाचे शास्त्रज्ञ म्हणतात, 94 टक्के प्रभावी लससुद्धा रोखू शकणार नाही संसर्ग

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क - अमेरिकन कंपनी मॉडर्नाने नुकतीच घोषणा केली होती की, त्यांची कोरोना व्हॅक्सिन 94 टक्के प्रभावी ठरली आहे. मात्र आता मॉडर्नाच्या प्रमुख शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, व्हॅक्सिन लोकांना आजारी पडण्यापासून वाचवू शकते. मात्र कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखू शकत नाही. 

मॉडर्नाचे प्रमुख शास्त्रज्ञ टल जक्स यांनी म्हटलं की, जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली तर व्हॅक्सिन कोरोनाचा संसर्ग इतरांना होण्यापासून रोखू शकणार नाही. चाचणीवेळी याची तपासणी करण्यात आली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. 

डेलीमेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मॉडर्नाच्या प्रमुख शास्त्रज्ञांनी सांगितलं की, लोकांनी व्हॅक्सिन प्रभावी ठरतंय याकडे खूप काही मोठं झालं अशा दृष्टीने पाहू नये. मॉडर्ना आणि फायजऱ दोन्ही कोरोना व्हॅक्सिनच्या ट्रायलवेळी कोरोनाचा संसर्ग इतरांना रोखण्यात यशस्वी होईल का? याची तपासणी केलेली नाही.

मॉडर्नाचे मुख्य शास्त्रज्ञ म्हणाले की, आम्हाला ट्रायल डेटामधून अशी माहिती मिळाली आहे की, व्हॅक्सिन तुम्हाला आजारी पडण्यापासून वाचवू शकते. मात्र यातून हे समजू शकले नाही की एखाद्याला कोरोना झाला असेल तर व्हॅक्सिन त्याच्यापासून इतरांना होणारा संसर्ग रोखू शकते की नाही?

एस्ट्राजेनका आणि ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सिनच्या ट्रायलच्या सुरुवातीच्या विश्लेषणानुसार, ही व्हॅक्सिन कोरोना व्हायरसच्या संसर्गाला रोखू शकते. मात्र अद्याप ट्रायल पूर्ण झालेली नाही आणि हा फक्त सुरुवातीचा डेटा आहे. इतर व्हॅक्सिनप्रमाणेच मॉडर्नाची व्हॅक्सिनसुद्धा अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे की, व्यक्तीच्या शरीरात असलेला कोरोना नष्ट करत नाही तर कोरोनाचा शरीरात इतर पेशींमध्ये पोहोचण्यापासून रोखतो. त्यामुळेच लोक आजारी पडत नाहीत. 

मॉडर्ना, फायजर पाठोपाठ ऑक्सफर्डची लससुद्धा 90 टक्के प्रभावी ठरल्याचं समोर आलं आहे. पहिल्या डोसमध्ये 90 टक्के लस कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरली असल्याची माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती लवकरच देण्यात येईल असं पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी सांगितलं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai -Bangalore New Train : मुंबई -बंगळूर आणखी एक रेल्वे धावणार; सांगली, मिरजेतून प्रवास, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांतील प्रवाशांना फायदा

महाराष्ट्र सरकार आणि रॅपिडोचा ऐतिहासिक करार! कॅप्टन आता 'माहिती दूत' बनणार; नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचणार

मोठी बातमी: १७८८ सामन्याचं वेळापत्रक BCCI कडून जाहीर; २३ ऑगस्टपासून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मेजवानी... जाणून घ्या डिटेल्स

Pune Andekar Gang Case : पुणे बालाजीनगर गोळीबार प्रकरणात अखेर आंदेकर टोळीवर गुन्हा; अक्षय म्हस्केच्या हत्येचा कट उघड?, आरोपींचा शोध सुरू

रेल्वेत नोकरीची मोठी संधी! ११९१ अप्रेंटिस पदांसाठी भरतीप्रक्रिया जाहीर; अर्ज कुठे आणि कसा करायचा?

SCROLL FOR NEXT