A student is saying that America, American government and democracy are a cancer Esakal
ग्लोबल

Viral Video: "इस्लाम हा एक न्याय्य धर्म, तो समाजावर लादला पाहिजे..." विद्यार्थ्याच्या खळबळजनक विधानामुळे सोशल मीडिया पेटले

US Is Cancer: एक युजर म्हणाला "आमच्या देशातून निघून जा. आमच्या देशाचा द्वेष करणारा कोणीही अमेरिकेत आम्हाला नको आहे. आणि परत कधीही इकडे येऊ नको."

आशुतोष मसगौंडे

अमेरिकेसह भारतात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण अमेरिका, अमेरिकन सरकार आणि लोकशाही हे कॅन्सर असल्याचे म्हणत आहे.

दरम्यान MEMRI या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्याचे नाव मोहम्मद नुसैरत असे असून, तो इलिनॉय शिकागो विद्यापीठात शिक्षण घेत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ 3 मे 2024 रोजी झालेल्या एका प्रवचनातील आहे.

याचबरोबर तो विद्यार्थी असेही म्हणाला की, "इस्लाम हा एक न्याय्य धर्म आहे जो समाजावर लादला गेला पाहिजे."

युनिव्हर्सिटीच्या मुस्लिम स्टुडंट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा विद्यार्थी म्हणाला, "अमेरिका हा कॅन्सर आहे. अमेरिका, अमेरिकन सरकार, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, भांडवलशाही, हे कॅन्सर आहेत ज्यांनी हा रोग जगभर पसरवला आहे,"

हा विद्यार्थी पुढे बोलताना म्हणाला, "मुस्लिम या कर्करोगाला, अमेरिकन सरकारला आणि लोकशाहीला कंटाळले आहेत. त्यांना जीवनाचा नवा मार्ग पहायचा आहे. आणि मुस्लिम म्हणून, आपल्याला हे समजले पाहिजे की आपल्याला नवीन जीवनपद्धती असली पाहिजे. इस्लाम हा एक न्याय्य धर्म आहे जो समाजावर लादला गेला पाहिजे."

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नुसैरतच्या या भाषणावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. या व्हायरल व्हिडिओखालील कमेंटमध्ये एक युजर म्हणाला "आमच्या देशातून निघून जा. आमच्या देशाचा द्वेष करणारा कोणीही अमेरिकेत आम्हाला नको आहे. आणि परत कधीही इकडे येऊ नको."

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, "त्याची स्कॉलरशिप आणि व्हिसा तात्काळ रद्द करण्यात यावा." तर आणखी एक युजरने कमेंट केली की, "जे लोक अमेरिकेला कंटाळले आहेत त्यांनी अमेरिकेत राहू नये."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT