Alexei Navalny Missing 
ग्लोबल

Alexei Navalny : पुतिन यांचे कट्टर विरोधक तुरुंगातून बेपत्ता; कैद्यांच्या यादीतूनही नाव गायब

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे राजकीय विरोधत अॅलेक्सी नवलनी हे तब्बल एक आठवड्यापासू बेपत्ता झाले आहेत

रोहित कणसे

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे राजकीय विरोधत अॅलेक्सी नवलनी हे तब्बल एक आठवड्यापासू बेपत्ता झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवलनी यांच्या वकिलांचे एक आठवड्यापासून त्यांच्याशी बोलणे झालेले नाहीये. इतकेच नाही तर कैद्यांच्या यादीमधून देखील त्यांचं नाव गायब झालं आहे.

मॉस्कोच्या पूर्वेला एका जेलमध्ये नवलनी यांना कैद करण्यात आले होते, त्यांना या वर्षीच तब्बल १९ वर्षांची कैद सुनावण्यात आली होती. नवलनी हे सोमवारी व्हिडीओ कॉफरन्सींगच्या माध्यमातून कोर्टात हजर केले जाणार होते, मात्र जेलकडून त्यांना सादर करण्यात आलं नाही. यावर लाइट नसल्याने नवलानी यांना हजर करता आले नाही, असं कारण जेल प्रशासनाने दिलं.

अॅलेक्सी नवलनी यांच्या प्रवक्ता कीरा यर्मिश यांनी सोमवारी सांगितलं की, नवलनी सहा दिवसांपासून गायब आहेत. पुन्हा-पुन्हा प्रयत्न करून देखील त्यांचे वकील त्यांना भेटू शकत नाहीयेत. त्यांना नवलनी जेलमध्ये नसल्याचे सांगितले जात आहे. य़ार्मिश यांनी वकिलांना सांगितलं की दिलेल्या माहितीनुसार नवलनी कैद्यांच्या सुचीमध्ये देखील नाहीयेत. अधिकाऱ्यांनी त्यांना कुठे स्थानांतरित करण्यात आलं आहे याबद्दल कुठलीही माहिती दिली नाहीये.

या दरम्यान नवलनी यांची टीमच्या हवाल्याने मॉस्को टाइम्सने एक रिपोर्टमध्ये माहिती दिली की जेलमध्य़े असलेले विरोधीपक्ष नेता खूपच खराब आहे. त्यांचे जवळचे सहकारी आणि नवलनी यांच्या अँटी करप्शन फाउंडेशन बोर्डचे अध्यक्ष मारिया पेवचिख यांनी सांगितलं की, त्यांना मागच्या आठवड्यात त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवल्या होत्या, नवलनी यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना सगळ्यापासून वेगळं ठेवण्यात आलं आङे. त्यांच्या वकिलांना देखील भेटू दिलं जात नसून वाट पाहण्यास सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT