Corona-Italy 
ग्लोबल

Fight with Corona : इटली जगाला दाखवतंय आशेचा किरण!

वृत्तसंस्था

रोम : कोरोना व्हायरसने इटलीमध्ये धूमाकूळ घातल्याने या देशाचे कंबरडेच मोडले आहे. कोरोनामुळे जगभरात सर्वात जास्त फटका बसलेला देश म्हणून आज इटलीला ओळखले जाते. कोरोनामुळे आतापर्यंत ९३५४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ८६,४९८ लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अस्मानी संकट कोसळले असतानाही इटलीमधील एक छोटंसं गाव जगाला आशेचा किरण दाखवत आहे. या गावाचं नाव आहे वो. 

इटलीच्या वेनेतो प्रांतात ३ हजार लोकवस्ती असणारं हे वो गाव. जगप्रसिद्ध व्हेनिस शहरापासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. २१ फेब्रुवारीला कोरोना व्हायरसने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने अख्ख्या जगाने या गावाची दखल घेतली होती. इटलीच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाला संसर्गजन्य रोग म्हणून घोषित केल्यानंतर २३ फेब्रुवारीला अख्ख्या गावानेच स्वत:ला क्वॉरंटाईन करून घेतलं होतं. 

वो गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक लोखंडी दरवाजा बसविण्यात आला. त्यामुळे गावातून बाहेर जायला आणि बाहेरून गावात येण्याला पूर्णपणे बंदी घालण्यात आली. फक्त आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांनाच या गावात जाण्याची-येण्याची परवानगी देण्यात आली होती. या आपत्तीतून वाचण्यासाठी लोकांना क्वॉरटाईन करणे आणि वारंवार आरोग्य तपासणी करण्याची रणनीती आम्ही आखली होती, अशी माहिती वो गावात राहणाऱ्या अलेस्सियो टुरेट्टाने ईयू ऑब्जर्वर वृत्तसंस्थेला दिली होती.

इटलीत राबवलं दक्षिण कोरियाचं मॉडेल

कोरोनाला आळा घालण्यासाठी दक्षिण कोरियाने स्वत: एक मॉडेल राबवलं होतं. याचंच अनुकरण करत वो गावाने ९७ टक्के जनतेची आरोग्य तपासणी केली. पहिल्याच दिवशी ८०० नमुने गोळा करण्यात आले. २९ फेब्रुवारीला ३ टक्के लोकांचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आले. या सर्व लोकांना घरातच जबरदस्ती क्वॉरंटाईन करण्यात आले. या व्यतिरिक्त जे लोक गंभीररित्या आजारी होते त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. 

ज्या लोकांना घरात डांबून ठेवण्यात आलं होतं, त्या सर्वांना वारंवार फोन करून त्यांची चौकशी करण्यात येत होती. आरोग्य तपासणी केल्यानंतर पुढे आलेल्या रिपोर्टनंतर डॉक्टरांनी त्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला. त्या सर्वांना घराबाहेर पडण्यास परवानगी नव्हती. हाच पॅटर्न यशस्वी ठरला. त्यानंतर ६ आणि ८ मार्चला करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीवेळी फक्त १ टक्के लोकांनाच कोरोना असल्याचे दिसून आले.

त्यानंतर २३ मार्चला कोरोनाला आळा घालण्यात वो गावाला यश आले. सध्या वो गावात एकही कोरोना संक्रमित व्यक्ती नसल्याचे तेथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT