Respresentative image  ANI
ग्लोबल

पेंटागॉनकडून स्ट्राइकची तयारी सुरु, अमेरिकेचा बदला घेण्याचा निर्धार

"आम्ही विसरणार नाही आणि माफही करणार नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल"

दीनानाथ परब

वॉशिंग्टन: अमेरिका ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तान (Afganistan) सोडणार असली, तरी काबूल विमानतळ परिसरात (Kabul airport area) झालेल्या हल्ल्याला अमेरिकेकडून प्रत्युत्तर दिले जाईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (jo biden) यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. काल काबूल विमानतळाचा परिसर दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी (bomb blast) हादरला. खास अमेरिकन्सना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या स्फोटामध्ये ७० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नागरिकांसह अमेरिकन सैनिकांचाही समावेश आहे.

अनेक अमेरिकन सैनिक या स्फोटात मृत्यूमुखी पडले आहेत. काही सैनिक जखमी आहेत. दशकभरात पहिल्यांदाच मनुष्यहानीच्या रुपाने अमेरिकेचं मोठं नुकसान झालय. इस्लामिक स्टेटने या आत्मघातकी बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली आहे. स्फोटाच्या या घटनेवर बोलताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भावूक झाले होते. त्यांनी बदला घेण्याचा निर्धार बोलून दाखवलाय. "आम्ही विसरणार नाही आणि माफही करणार नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल" असं बायडेन यांनी म्हटलं आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरु राहील. पुढच्या मंगळवारपर्यंत आपल्या सर्व नागरिकांना बाहेर काढून अफगाणिस्तान सोडण्याची अमेरिकेची योजना आहे. त्यात कुठलाही बदल झालेला नाही. जवळपास १ हजार अमेरिकन नागरिक आणि सर्वसामान्य अफगाणि काबुलमधून निघण्यासाठी प्रयत्न करत आहेत. "मी माझ्या कमांडर्सना आयएसआयएस-के ची संपत्ती, नेतृत्व आणि सुविधांवर स्ट्राइक करण्यासाठी प्लान बनवण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही आमच्या सोयीने हल्ल्याचं ठिकाणं आणि वेळ ठरवून शक्तीशाली प्रहार करु" असे बायडेन म्हणाले.

ISIS-K आणि तालिबानने संगनमताने हे घडवून आणल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे बायडेन यांनी सांगितले. सध्या अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता आहे. मागच्या दोन-तीन दिवसांपासून काबूल विमानतळ परिसरात काही तरी घडू शकते, असे इशारे गुप्तचर यंत्रणांकडून दिले जात होते. अखेर काल हा परिसर शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: पुण्यातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT