WHO director 
ग्लोबल

लस आली म्हणजे 'कोरोना' संपला असं समजू नका; WHOच्या प्रमुखांनी दिला इशारा

सकाळवृत्तसेवा

कोरोना व्हायरसवरील लस आल्याने व्हायरस स्वत:चं संपणार नाहीये, असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल टेड्रॉस अधनॉम घेबेरियस यांनी केलं आहे. लस जवळ आलीय याचा अर्थ हे कोरोनाचे महासंकट संपलेले आहे, असे समजणे चुकीचे आहे. असा विश्वास बाळगून आत्मसंतुष्टी बाळगणे चुकीचे ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. लशीच्या निर्मितीमध्ये प्रगती होत असल्याने आपल्याला एक आशेचा किरण दिसत आहे. मात्र, साथीचा रोग आता संपलेलाच आहे अशी एक सामान्य धारणा वाढताना दिसत आहे, ज्याविषयी आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केलीय. टेड्रॉस पुढे म्हणाले की साथीच्या रोगाचा आजार अद्याप कायम आहे. 

आम्हाला याची कल्पना आहे की हे वर्ष कठीण होतं आणि लोक कंटाळले आहेत. पण क्षमतेपेक्षा अधिक रितीने चालवावे लागलेल्या हॉस्पिटल्ससाठी हे सर्वांत जास्त कठीण होते. सध्या वास्तव असे आहे की, अनेक ठिकाणी व्हायरसचा प्रसार खूपच गतीने होतो आहे. यामुळे हॉस्पिटल्स, आयसीयू आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आहे.

ब्रिटनने अलिकडेच बुधवारी फायझर या कोरोनावरील लशीचा मान्यता दिली आहे. या रोगाशी सामना करण्यासाठी लशीकरणाच्या शर्यतीत त्यांनी इतरांहून आघाडी घेतली आहे. एका वर्षापूर्वी चीनमधील वुहानमधून पसरलेल्या या व्हायरसने जवळपास 1.5 दशलक्ष लोक मारले आहेत. या व्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्था तसेच सामान्य जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. मात्र, लशीच्या प्रगतीमुळे हे वादळ लवकरच शमेल, अशी आशाही निर्माण झाली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या सध्याच्या आकडेवारीनुसार, 51 लशींची मानवी चाचणी घेण्यात येत आहे. यातील 13 लशी या Mass Testing च्या टप्प्यावर आहे. उर्वरित 163 लशींची निर्मिती प्रयोगशाळेत होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझा बॅचमेट इथं अधिकारी, बोगस IPS पोहोचला पुणे आयुक्तालयात; ज्याचं नाव घेतलं तो समोर येताच...

IND vs AUS 3rd T20I : अखेर, सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला! संजू सॅमसनसह तिघांना प्लेइंग इलेव्हनमधून केले बाहेर, बघा कोणाला मिळालीय संधी

Prakash Ambedkar : सरकारला शांत झोप लागावी म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात? प्रकाश आंबेडकर अजित पवार यांच्यावर संतापले

MPSC News : माऊलीच्या कष्टाचं सोनं! सफाई कामगार आई अन् बुट पॉलिश करणारा भाऊ; गरीबाची लेक MPSC तून बनली Class 1 अधिकारी, संघर्ष एकदा वाचाच

Konkan Rice Fields Damage : धीम्या पंचनाम्यांमुळेच बळीराजाच्या जखमेवर मीठ, कोकणात भात पिक बघायला म्हणून शिल्लक नाही

SCROLL FOR NEXT