ग्लोबल

'मायक्रोसॉफ्ट'च्या चेअरमन पदी मजल मारलेल्या सत्या नडेलांचा जाणून घ्या प्रवास

विनायक होगाडे

नवी दिल्ली : सत्या नडेला यांनी मायक्रॉसॉफ्ट कंपनीचं चेअरमॅन बनवण्यात आलं आहे. भारतीय-अमेरिकन वंशाचे सत्या नडेला यांचा जन्म 19 ऑगस्ट 1967 रोजी हैद्राबादमध्ये झाला होता. बेगमपेटमधील हैद्राबाद पब्लिक स्कूलमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं होतं. त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण झाल्यानंतर विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीमधून मास्टर ऑफ सायन्स आणि शिकागो युनिव्हर्सिटीमधून एमबीए केलं. 25 वर्षे वयामध्येच त्यांनी मायक्रॉसॉफ्टमध्ये सर्व्हार ग्रुपचं काम करण्यास सुरुवात केली.

22 वर्षांपर्यंत मायक्रॉसॉफ्टमध्ये काम केलं

नडेला 1992 मध्ये मायक्रॉसॉफ्टशी जोडले गेले. या 22 वर्षांमध्ये त्यांनी विंडो सर्व्हर, डेवलपर्स टूलसारख्या अनेक प्रोडक्ट्ससाठी नेतृत्व केलं. मात्र, त्यांना खरी ओळक क्लाऊड कंम्प्यूटींगमधून मिळाली.

क्लाउड गुरु सत्या नडेला

मीडिया रिपोर्ट्सनुसार क्लाउड कम्पुटींगच्या डेव्हलपमेंटचा सल्ला देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांमध्ये सत्या नडेला हे एक होते. त्यांच्या या सल्ल्यानंतरच मायक्रॉसॉफ्टने यावर काम करणं सुरु केलं होतं. त्यानंतर लागलीच त्यांना सर्व्हर आणि टूल्स डिव्हीजनचा अध्यक्ष बनवण्यात आलं. त्यानंतर त्यांना ऑनलाईन सर्व्हिसेस डिव्हीजनचा वरिष्ठ उपाध्यक्ष, मायक्रॉसॉफ्ट बिझनेस डिव्हीजनचा उपाध्यक्ष, बिझनेस सोल्यूशन्स अँड सर्च एँड एडव्हर्टायझिंग उपाध्यक्ष आणि त्यानंतर क्लाउड अँड एंटरप्राईज विभागाचा कार्यकारी उपाध्यक्ष बनवलं गेलं.

मायक्रॉसॉफ्टचं म्हणणं आहे की, त्यांच्या सर्वांत यशस्वी प्रोडक्ट्सपैकी ऑफिस 365 आहे. 'अजूर' (मायक्रॉसॉफ्टची स्वत:ची क्लाउड सेवा) ची स्थापना करण्यात देखील नडेला यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. त्यामुळेच त्यांना क्लाउड गुरु नावाने देखील ओळखलं जातं.

बिल गेट्सच्या पदावर सत्या नडेला

यानंतर 2014 मध्ये सत्या नडेला यांना मायक्रॉसॉफ्टच्या 38 वर्षांच्या इतिहासात तिसरे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ बनले. त्यांच्या आधी हे पद स्टीव बामर आणि कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांच्याकडे होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT