donald trump main 1.jpg 
ग्लोबल

'चार वर्षांनंतर मी पुन्हा येईन', डोनाल्ड ट्रम्प यांचा आता 2024 साठी दावा

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ज्यो बायडन यांनी पराभव केला आहे. परंतु, ट्रम्प हे कधी आपला पराभव मान्य करतात तर कधी म्हणतात मीच विजयी झालो. सातत्याने आपली भूमिका बदलणारे ट्रम्प यांनी आता स्वतःला 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचा उमेदवार घोषित केले आहे. 'आपली चार वर्षे जबरदस्त होती. आम्ही आणखी चार वर्षांसाठी प्रयत्न करत आहोत. नाहीतर आपण पुन्हा चार वर्षांनी भेटूच', असे ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस येथे ख्रिसमससाठी आयोजित पार्टीत म्हटले.

या कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाचे अनेक दिग्गज सहभागी झाले होते. या कार्यक्रमात माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नव्हता. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ कार्यक्रमानंतर लगेच सार्वजनिक करण्यात आला. 

निवडणूक होऊन एक महिना झाल्यानंतरही 74 वर्षीय ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला आहे. बायडन यांच्यापेक्षा आपणच आघाडीवर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे बायडन यांनी मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या तयारीला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प हे व्हाइट हाऊसमध्येच जास्त वावरत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांचा वावर कमी झाला आहे. निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करताना ते चिथावणीखोर टि्वट करण्यासही मागेपुढे पाहत नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे ऍटर्नी जनरल यांनी निवडणूक अत्यंत सुरक्षित झाल्याचे म्हटले आहे. 

निवडणुकीचे निकाल प्रभावित करतील असा घोटाळा झाल्याची एकही गोष्ट आजपर्यंत आम्हाला दिसलेली नाही, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया अमेरिकेचे ऍटर्नी जनरल बिल बार यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना दिली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

Chhatrapati Sambhajinagar News: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी अखेरची संधी; १९-२० मार्चपर्यंत मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

Mahalakshmi Temple: भुईंजच्या महालक्ष्मी मंदिरात निसर्गाचा चमत्कार; सूर्यकिरणांच्‍या अभिषेकाने तेजाळली मूर्ती, काय आहे पाैराणिक महत्व!

SCROLL FOR NEXT