Woman Raped in Plane Fellow Traveler
Woman Raped in Plane Fellow Traveler Sakal
ग्लोबल

उडत्या विमानात महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

सकाळ डिजिटल टीम

विमानातून प्रवास करणे हे अनेकांचे स्वप्न असते. विमान प्रवास हा जलद आणि आरामदायी असतो. परंतु कधीकधी विमान प्रवासादरम्यान काही संतापजनक घटनाही घडतात. नुकतेच अमेरिकेतील (USA) न्यू जर्सी येथून लंडनला (London) जाणाऱ्या विमानात (Plane) एक धक्कादायक घटना घडली आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या महिलेने आपल्यावर विमानात बलात्कार (Sexually Harassment) झाल्याची तक्रार केली आहे. हा आरोप समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. (Woman Raped in Plane Fellow traveler)

इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व प्रवासी झोपलेले असताना ही घटना घडली आणि हा सर्व प्रकार फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये घडला आहे. या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, आरोपी आणि आरोप करणारी महिला हे एकमेकांच्या ओळखीचे नसून दोघांनी एकमेकांना भेटल्यानंतर संभाषण केले होते. यानंतर दोघांनी विमानातच मद्यपान केले.

दारू पिऊन आरोपीने बलात्कार केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. महिलेने सर्वप्रथम फ्लाइट स्टाफला याची माहिती दिली, त्यानंतर एअरलाइन्स कर्मचाऱ्यांनी लंडन पोलिसांना (Police) माहिती दिली. विमान हिथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच पोलीस अधिकारी विमानात आले आणि आरोपीला अटक (Arrest) केली.

न्यू जर्सी ते लंडन थेट विमान प्रवासासाठी सुमारे सात तास लागतात. याच दरम्यान ही घटना घडली. फ्लाइट लँड होताच पीडितेला समुपदेशनासाठी नेण्यात आले. अधिकाऱ्यांनी विमानाची फॉरेन्सिक तपासणीही केली. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून काही वेळाने जामीनही मंजूर झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT