World-Cancer-Day 
ग्लोबल

World Cancer Day : जगात मिनिटाला १७ जणांचा कर्करोगाने मृत्यू; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

सकाळवृत्तसेवा

जगात चार फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. याचा उद्देश लोकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करणं हा आहे. जागतिक कर्करोग दिनाची तीन वर्षांसाठी एक थीम ठरवण्यात येते. यावेळी ती थीम 'मी आहे आणि राहीन' अशी २०१९ ते २०२१ या कालावधीसाठी आहे. कर्करोगाच्या या थीमचा अर्थ असा आहे की, कर्करोग झालेली व्यक्ती इच्छाशक्तीच्या जोरावर या आजारावर मात करू शकते.

कर्करोग आता लोकांसाठी नवा नाही. जवळपास प्रत्येकाने याचं नाव ऐकलं आहे आणि आपल्या आजुबाजुला अशा लोकांना पाहिलं आहे, गमावलं आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, योग्य वेळी कर्करोग ओळखता आला तर त्यावर उपचार होऊ शकतात. अद्याप यावर कोणताही उपचार नाही किंवा निश्चित असा उपचारही नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार जगात प्रत्येक मिनिटाला १७ जणांचा मृत्यू फक्त कर्करोगाने होतेय. २०१८ मध्ये भारतात जवळपास ११ लाख ५७ हजार कर्करोगाचे रुग्ण आढळले होते.  यापैकी ७ लाख ८४ हजार जणांचा मृत्यू झाला होता. 

शरीर हे पेशींपासून बनलेलं असतं. या पेशींची वाढ अनियंत्रित होते आणि शरीरात पसरायला लागते. यामुळे शरीराच्या इतर अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो. या पेशी ज्या भागात वाढतात तिथं गाठ तयार होते यालाच कर्करोग म्हटलं जातं. 

स्तनांमध्ये गाठ असणं किंवा इतर बदल, आतडे, मूत्राशय इत्यादीमधून रक्तस्राव, बराच काळ खोकला, शरीरातून रक्तस्राव किंवा एखादा द्रव बाहेर पडणं, वजनात एकदम वाढ किंवा घट यांसारखी वेगवेगळी लक्षणं यामध्ये असतात.

कर्करोगापासून वाचण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये धूम्रपान, तंबाखू यांचे सेवन टाळणे. जास्त वजन वाढणार नाही याची काळजी घेणे, अल्कोहोल तसंच फास्टफूडचं प्रमाण कमी असावं. दररोज व्यायाम आणि पौष्टिक आहार घेणे. नियमित आरोग्य तपासणी करावी आणि अल्ट्राव्हायोलेय किरणांपासून दूर रहावं.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax law : १ एप्रिल २०२६ पासून मोदी सरकार तुमच्या फोनमधील मेसेज चेक करणार? नव्या Income Tax कायद्यामागचं सत्य काय?

Latest Marathi News Live Update : वाहन चालकाला डुलकी लागल्याने समृद्धी महामार्गावर अपघात, महिला जखमी

Leopard: शिकार केलेल्या ठिकाणी बिबट्या पुन्हा-पुन्हा का येतो? माणसाने कोणती काळजी घेतली पाहिजे?

Shashikant Shinde : पक्षाचे हित महत्त्वाचे; सन्मानजनक प्रस्तावासह दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर निर्णय होईल- शशिकांत शिंदे!

Pune Police Rescue : बाणेरमधील लॉजवर पोलिसांची धडक; महिलांची सुटका; व्यवस्थापकासह चार आरोपी अटकेत!

SCROLL FOR NEXT