World Consumer Rights Day 2024 esakal
ग्लोबल

World Consumer Rights Day 2024 : तुम्हाला माहितीये का जागतिक ग्राहक हक्क दिन का साजरा केला जातो?

जगभरात १५ मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय ग्राहक चळवळीतील उत्सव आणि एकता यासाठी हा दिवस साजरा करतात.

सकाळ डिजिटल टीम

World Consumer Rights Day 2024 : जगभरात १५ मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय ग्राहक चळवळीतील उत्सव आणि एकता यासाठी हा दिवस साजरा करतात. ग्राहक चळवळीद्वारे दरवर्षी 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो.

जगभरात ग्राहक हक्क आणि गरजांबद्दल जागरूकता वाढवण्याचे एक साधन म्हणून हा दिवस महत्वाचा असतो. हा दिवस साजरा करण्यामागे ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची मागणी होत असते.

जागतिक ग्राहक हक्क दिनाची प्रेरणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दिवंगत जॉन एफ केनेडी यांच्याकडून घेतली गेली. त्यांनी १५ मार्च १९६२ रोजी युएस कॉंगेसला एक विशेष संदेश पाठवला. यामध्ये त्यांनी ग्राहक हक्कांचा मुद्दा ठळकपणे मांडला. असे करणारे ते पहिले जागतिक नेते होते.

त्यानंतर ग्राहक चळवळीने १९८३ मधली तारीख ठरवली. त्यानंतर १५ मार्चपासून ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहकांच्या महत्वाच्या समस्यांवर योग्य दिशा देऊन त्या सोडविण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

स्वच्छ उर्जा संक्रमणाद्वारे ग्राहकांचे संरक्षण संकल्पनेबद्दल 

जिवाश्म इंधनासारख्या पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, आणि शाश्वतता, सुरक्षितता, किफायतशीरपणा, आणि ग्राहकांसाठी दीर्घ काळ उपलब्धतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्वच्छ ऊर्जा उपायांकडे जलद संक्रमण करता यावे, यासाठीच्या संकल्पनेला अनुसरून, तंत्रज्ञानाच्या वापरावर प्राथमिक भर दिला जाणार आहे.

ग्राहक हक्कांबद्दल काही तथ्ये

- ग्राहक न्यायालयात हजर राहण्यासाठी वकिलाची गरज नाही

- एखादी व्यक्ती स्वतःहून त्यांच्या केसचे प्रतिनिधित्व करू शकते आणि त्याला कोणत्याही वकिलाची गरज नाही

- एक ग्राहक म्हणून, तुम्हाला वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता, शुद्धता, किंमत, प्रमाण इत्यादी सर्व उत्पादन माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे.

- प्रत्येक ग्राहकाला त्यांना हवी असलेली वस्तू आणि सेवा निवडण्याचा किंवा त्याचा पर्याय निवडण्याचा अधिकार आहे

- अनुचित व्यवसाय पद्धतींविरुद्ध ग्राहक भरपाई मागू शकतो

- जगातील सुमारे ८० देशांनी ऑनलाइन खरेदीसाठी व्यावसायिक नियमांमध्ये ग्राहक संरक्षणाची तत्त्वे समाविष्ट केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : पदवीधरांचा कौल सरकारविरोधात; धोरणांबद्दल तरुणांची नाराजी, दुष्काळी मदतीची पाच हजारांची रक्कम अपुरी

मोठी बातमी! INDIA आघाडीच्या महारॅलीला अभिजीत दीपके यांचा पाठिंबा; ‘GYANU MUST GO’ म्हणत पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: ''महाराष्ट्रात आणखी २३ प्रकल्प येत आहेत.. भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड टेंडरशिवाय'', राज ठाकरेंची कर्जतमध्ये सभा

MLA Harshada Deshmukh : एमपीएससीतील पारदर्शकतेसाठी प्रयत्न करणार; रोजगार, शिक्षणाच्या प्रश्नांवरही देणार भर

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

SCROLL FOR NEXT