Shivsena leader Sanjay Raut's Four member corona positive
Shivsena leader Sanjay Raut's Four member corona positive  esakal
Goa Assembly Election

गोव्यात शिवसेनेला झटका! NOTA पेक्षा मिळाली कमी मतं

Amit Ujagare (अमित उजागरे)

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा (ShivSena) दारुण पराभव झाला असून एकही जागा त्यांना राखता आलेली नाही. उलट नन ऑफ दि अदर (NOTA) या पर्यायाला शिवसेनेपेक्षा अधिक मत मिळाली आहेत. त्यामुळं शिवसेनेसाठी ही धक्कादायक गोष्ट मानली जात आहे. निवडणूक आयोगानं आपल्या वेबसाईटवर याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. (Shock to Shiv Sena in Goa Less votes received than NOTA)

Goa Election

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, गोव्यात शिवसेनेला एकूण मतदान ०.१९ टक्के इतकं झालं आहे. यामध्ये १,५२२ इतकी एकूण मतं शिवसेनेला मिळाली आहेत. तर कुठलाही उमेदवार नकारण्याचा पर्याय असलेल्या नोटाला १.१३ टक्के मतं मिळाली आहेत, यामध्ये एकूण ९,०९६ मतांचा समावेश आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीतील एकूण मतदानापैकी शिवेसेनेपेक्षा नोटाच्या मतदानाची टक्केवारी जास्त असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामुळं गोव्यात पक्ष वाढवण्याच्या शिवसेनेच्या स्वप्नांना काहीसा सुरुंग लागला आहे.

दरम्यान, गोव्यात महाराष्ट्राप्रमाणं शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मांडली होती. मात्र, काँग्रेसनं याला विरोध दर्शवला होता. याचाही फटका शिवसेनेला बसला आहे. मात्र, काँग्रेसही पिछाडीवर असून भाजपने आघाडी घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT