air conditioner 
health-fitness-wellness

सततचा एसी ठरू शकतो घातक; जाणून घ्या 7 कारणे

सकाळ वृत्तसेवा

अनेकांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये एअर कंडिशनर(एसी) असते.  एअर कंडिशनरमुळे आपल्याला अल्हादायक वाटत असले तरी जास्त वेळ अशा वातावरणात राहणे शरिरासाठी हानिकारक ठरु शकते. सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग बेजार आहे. ऑफिस किंवा घरी एसी चालू न ठेवण्याचा सल्ला तुम्ही अशात ऐकला असेल. थंड वातावरणात कोरोना व्हायरस जास्त काळ तग धरुन राहतो. त्यामुळे शक्यतो एसीचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात येतो. याशिवाय एसीच्या थंड वातावरणात जास्त काळ राहण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. 

एअर कंडिशनर पुढील सात कारणांसाठी नुकसानदायी ठरु शकते...

1. एसीमुळे सभोवतालचे वातावरण थंड होते. तसेच शरीराचे तापमान कमी होते. कमी तापमानामुळे डोक्यातील पेशी संकुचित होतात. याचा बुद्धीची क्षमता आणि क्रियाशिलतेवर विपरित परिणाम होऊ शकतो.

2. एसीमध्ये जास्त काळ राहणे त्वचेसाठी चांगले नसते, त्वचा शुष्क पडण्याची शक्यता असते. 

3. जास्त वेळ एसीमध्ये राहिल्याने गुडघेदुखीचा त्रास सुरु होण्याची शक्यता असते. जास्त वेळ एसीमध्ये बसल्याने शरीर आकडण्याची शक्यता असते.

4. जास्त काळ एसीमध्ये घालवत असल्याने रक्तदाबाची(ब्लड प्रेशर) समस्या जाणवू शकते. एसीमध्ये राहिल्याने कमी रक्तदाब होऊ शकतो. 

5. एसीमध्ये जास्तवेळ घालवणे अस्थमा किंवा दमा असणाऱ्या रुग्णांसाठी धोकादायक मानलं जातं. हवेत असणारा ओलावा अस्थमासाठी ट्रिगरसारखं काम करु शकतो. 

6. एसीमध्ये जास्त वेळ घालवत असल्याने वजन वाढण्याची दाट शक्यता असते. थंड जागेत काम केल्याने आपल्या शरिरातील उर्जा जास्त खर्च होत नाही. त्यामुळे शरिराची चरबी वाढण्याची शक्यता असते.

7. खूप वेळ एसीमध्ये काम करत राहिल्याने थकवा, डोकेदुखी, चिडचिडपणा जाणवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT