aphthae causes and tips for relife from them 
health-fitness-wellness

सारखं सारखं तोंड येतयं ? काय आहेत कारणे ?

सकाळवृत्तसेवा

'मला ना सारखं तोंड येत. मग चांगले पदार्थ खाता येत नाही की गरम काही पिता येत नाही' ही समस्या प्रत्येकाला कधी ना कधी जाणवतेच. तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काहीही खाताना जिभेची, हिरड्यांची आग होणे, तिखट, खारट व आंबट चवी जराही सहन न होणे अशा तक्रारी यात जाणवतात. यात ओठ, जीभ, पडजीभ, घसा, टाळा यांना सुज येते. त्यामुळे आपल्याला काहीही खाता येत नाही आणि नीट गिळताही येत नाही. हे दुखणे फार मोठे नसलं तरी त्याचा त्रास खुप होतो. वारंवार तोंड त्यामुळे वेळीच त्यावर योग्य ते उपचार घेणे महत्वाचे आहे.

कारणे काय ?

  • शरीरात अतिरिक्त उष्णता वाढणे. एखाद्या आजारावर दीर्घकाळ औषधे घेत असल्यास त्या औषधांचे साईड इफेक्‍ट होऊनही तोंड येते. अति प्रमाणात चहा, कॉफी किंवा तंबाखूचे सेवन, अति धुम्रपान , अतिप्रमाणात तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थ खाणे.
  • पचनाच्या तक्रारी असलेल्यांनाही तोंड वारंवार येते. विशेषतः पोट साफ नसल्यास दातांचे विकार असल्यास किंवा दात झिजून टोकदार झाल्यास ते लागून तोंडात व्रण उठतात.
  • कुपोषण किंवा जीवनसत्वाच्या अभावामुळेही तोंड येते.

ही काळजी घ्या

  • तोंड आल्यानंतर वेदना कमी करून तात्पुरते बधीरत्व आणणारी मलमे सध्या उपलब्ध आहेत. त्याचा वापर डॉक्‍टरांच्या सल्ल्याने करा.
  • उष्णतेने तोंड आले असल्यास नारळपाणी, सौम्य चवीचे सूप, थंड दुध असे पदार्थ आहारात घ्यावेत.
  • आहार चौरस व सर्व पोषक द्रव्यांचा पुरवठा होईल. असा असावा. अति तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ टाळावे.
  • तोडांची नियमित व योग्य प्रकारे स्वच्छता करावी.
  • जेवणाच्या वेळा पाळाव्यात. रात्रीची झोप व्यवस्थित घ्यावी.
  • फास्ट फुड, जंक फुड घेऊ नये. अति थंड, अतिगरम असे पदार्थ खाऊ नये.
  • उन्हाळ्यामध्ये मासांहार टाळावाच.
  • तोंड आल्यावर जिरे चावून खाल्ल्यानेही फायदा होतो.


 

अति जागरण, मानसिक ताण तणाव, ब - 12 जीवनसत्वाचा अभाव, अवेळी जेवणे यामुळे तोंड येण्याची समस्या जाणवते. तोंड आल्यानंतर अतिगरम, थंड पदार्थ घेऊ नयेत. तिखट, मसालेदार पदार्थ वर्ज्य करावेत.
- डॉ. अशोक पाटील, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : पायाभूत प्रकल्प तातडीने मार्गी लावा - मुख्यमंत्री

Raj Thackeray Angry Reaction: ‘’निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद पाहून, तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता...’’

Leopard Conflict : मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी चार तासांत ११.२५ कोटींचा निधी मंजूर!

माझ्या माघारी मुलाला कोण सांभाळेल... मराठी अभिनेत्रीने सांगितला घटस्फोटाचा काळ; म्हणाली, 'रात्रभर झोप... '

SCROLL FOR NEXT