setubandhasana
setubandhasana 
health-fitness-wellness

फॅब-अ‍ॅब : होल्ड दॅट कोअर टाइट...

मौशुमी नगरकर

तुम्ही तुमच्या जीम ट्रेनरकडून ‘होल्ड दॅट कोअर टाइट’ हा सूचनावजा आदेश अनेकदा ऐकला असेल. अर्थात, त्यासाठी कोअर म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. कोअर म्हणजे छातीच्या खालच्या बाजूपासून ओटीपर्यंत अनेक स्नायूंचा एकत्रित बनलेला भाग. तो आपल्या शरीराचे ऊर्जाकेंद्र आहे. कोणत्याही वेदनेशिवाय आपल्या दैनंदिन हालचाली यामुळे सुसह्य होतात. विशेषतः पाठीचा कणा मजबूत करतात.

तुम्ही श्‍वासोच्छ्‌वास करताना या सर्व स्नायूंचा वापर करता. याचबरोबर मोठ्याने ओरडताना नेहमीच्या भाषेत सांगायचे तर, ‘बेंबीच्या देठापासून’ ओरडताना तसेच तुम्ही चालता, बसता, धावता, उड्या मारता यासर्व क्रियांसाठी ‘कोअर’चाच वापर करता.

थोडक्‍यात काय, तर शरीरातील सर्व हालचाली ‘कोअर’शिवाय पूर्ण होतच नाहीत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयोगटात ‘कोअर’ मजबूत असणे आवश्‍यक का आहे, हे लक्षात येईल. मजबूत ‘कोअर’मुळे तुमच्या शरीरातील पाठीबरोबरच शरीराच्या खालच्या भागातील वेदना कमी होतात. मजबूत ‘कोअर’ पाहिजे म्हणजे, ‘सिक्‍स पॅक ॲब’ नाही.

आपल्याला केवळ वरवर पिळदार दिसून चालणार नाही, तर आयुष्यभर वेदनारहित जगण्यासाठी आतूनही तितकेच मजबूत स्नायू आवश्‍यक आहेत. एकदा शारीरिक वेदना सुरू झाल्यावर आयुष्यातील मजाच निघून जाते.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुमच्या पाठीचा कणा, विशेषतः त्याखालील भाग आयुष्यभर ताण घेत असतो. अगदी उभे राहणे, बसणे, वाकणे यासाठी आयुष्यभरासाठी तो उपयोगी पडतो. तुमचा ‘कोअर’ मजबूत असल्यास कितीही काम केले, वाजवीपेक्षा अधिक श्रम केले तरी पाठीच्या दुखण्याची समस्या निर्माण होत नाही. तुमच्या दैनंदिन हालचालींमध्ये ‘कोअर’ महत्त्वाची भूमिका बजावत असते. स्नायूंच्या बळकटीकरणासाठी काही व्यायाम करणे आवश्‍यकच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT