Depression  sakal
health-fitness-wellness

Depression Symptoms : 'ही' आहेत डिप्रेशनची नवी लक्षणं; होऊ शकतात गंभीर आजार

आजकाल डिप्रेशनची लक्षण सुद्धा पूर्वी सारखी कळून येतातच अस नाही.

सकाळ डिजिटल टीम

डिप्रेशनची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यात आजकाल डिप्रेशनची लक्षण सुद्धा पूर्वी सारखी कळून येतातच अस नाही. अनेकदा आपल्याला डिप्रेशन आलेल असतं पण तो काही सर्दी खोकला तापासारखा आजार नाही त्यामुळे ते कळत नाही.

एखाद्याच्या मानसिक आरोग्याचा अंदाज लावण फार कठीण आहे. समोरची व्यक्ती कोणत्या अवस्थेत आहे हे कोणालाच माहीत नसत? खरंतर आपल्याकडे अजूनही डिप्रेशनबद्दल तेवढ स्पष्टपणे बोललं जात नाही पण परिस्थिती आधी पेक्षा बरीच चांगली आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

खूप उदास वाटण, अचानक रडू येणं, चिडचिड होणं ही काही बेसिक कारण डिप्रेशनची सांगितली जातात. पण आता याची काही नवी कारणं समोर आली आहेत. थेरपिस्टच्या म्हणण्यानुसार आता डिप्रेशनच्या रोग्यांची नवीन लक्षणं त्यांच्या स्मार्टफोनच्या आणि इंटरनेटच्या वापरावरून दिसून येता आहेत.

डिप्रेशनची नवीन लक्षणे:

डिप्रेशनची तीव्र लक्षणे कोणती आहेत? डिप्रेशनचीला वैद्यकीय भाषेत मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर म्हणतात. डिप्रेशनमध्ये रडणे, थकवा, निराशा, झोप न येणे, भूक न लागणे, अचानक वजन कमी होणे यासारखे शारीरिक आणि मानसिक अनुभव येऊ शकतात.

डिप्रेशन आलेली माणसं आपली मानसिक स्थिती लपवण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा म्हणूनच आपल्याला कळतच नाही की समोरचा माणूस डिप्रेस आहे. आता लक्षणं त्यांच्या स्मार्टफोनच्या आणि इंटरनेटच्या वापरावरून दिसून येता आहेत.

अनेकदा तुमच्या मेसेजला खूप काळानंतर त्यांचा रिप्लाय असा काहीसा येऊ शकतो.

  • सॉरी, मी रिप्लाय नाही देऊ शकलो/शकले

  • मला काय बोलाव कळत नाहीये

  • नको कशाला तुला त्रास

  • मला भीती वाटत होती की मी तुझा मूड खराब करतेय/ करतोय

  • मला जरा वेळ हवा आहे प्लीज

  • मला माझा त्रास लोकांना नाहीये दाखवायचा

  • मी खूप अस्वस्थ आहे आणि काही दिवस सर्वांपासून दूर राहायच आहे.

  • भेटण्याचा किंवा बोलण्याचा मूड/एनर्जी नाही.

थेरपिस्टच्या मते, उत्तर देण्यासाठी किंवा भेटण्यासाठी शारीरिक आणि मानसिक ऊर्जा लागते. डिप्रेशनमध्ये याच ऊर्जेची कमतरता असते, त्यामुळे एखाद्याशी गप्पा मारणं किंवा त्याला भेटवस वाटत नाही.

अशा वेळेस काय करावं?

- अशा व्यक्तीला एकटे सोडू नका

एखाद्या व्यक्तीमध्ये नवीन आणि जुनी कोणतीही लक्षण दिसू लागली तर त्याला डिप्रेशन आलेल आहे. अशा व्यक्तीच वागणं मनावर घेऊ नका. त्याला एकट सोडू नका. आपण तिच्यासोबत आहोत याची तिला जाणीव करून द्या. नेहमी जवळ असण्या साठी समोरच असण्याची गरज नसते; तुम्ही फोनवरही तिची चौकशी करू शकतात.

- फक्त आत्ताचा विचार करा

ज्याला मुळात स्वतःला डिप्रेशन आल आहे त्यानेही यातून बाहेर पडण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजे. संकटही नेहमीच येतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जगणच सोडाव; ज्यात आनंद वाटतो आहे अशा गोष्टींवर फोकस करा. स्वतःला वेळ द्या आणि लक्षात ठेवा की एक दिवस सगळ काही चांगले होणार आहे.

- तज्ञांना भेटा

डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही तज्ञांना भेटा. तो तुमची स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक थेरपी आणि औषधे सुचवू शकतो. मानसिक समस्या हा देखील एक प्रकारचा रोग आहे, ज्याचा उपचार करण्यासाठी एखाद्या तज्ञाची गरज असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कर्नाटक-तामिळनाडूमधील कावेरी वादावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

Alien Star Reels Viral: इंस्टावर व्हायरल झालेला ‘एलियन स्टार’ कोण? आधी लोकांनी उडवली थट्टा, आता प्रत्येक व्हिडिओला मिलियन व्ह्यूज

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

SCROLL FOR NEXT