benefits of beetroot juice nagpur news  
health-fitness-wellness

फक्त ग्लासभर 'बिटा'चा ज्युस प्या अन् बघा चमत्कार, शरीर सुदृढ बनण्याबरोबरच होईल 'हा' सर्वात मोठा फायदा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : तरुण तरुणी असेल किंवा प्रौढ प्रत्येकाला वाटतं की आपण एकदम फीट राहावं. त्यासाठी अनेकजण व्यायामाचा पर्याय निवडतात. काही जण जीमही लावतात. मात्र, जीममध्ये जाण्यापूर्वी आणि वर्क आऊटनंतर काहीतरी पोटात टाकणे गरजेचे असते. आपण योग्य आहार घेतला तर नक्कीच वर्क आऊटचा फायदा होईल. मात्र, आपण काहीतरी खायचं म्हणून खात असतो. त्यामुळे ताण-तणाव वाढत असतो, तर वर्कआऊट केल्यानंतर नक्की कोणत्या पदार्थाचं सेवन करायचं? त्याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

वर्कआऊटच्या आधी पौष्टीक पदार्थांचे सेवन केल्याने त्याचा व्यायाम करताना फायदा होतो. मात्र, वर्कआऊटनंतर जास्त पौष्टीक पदार्थाचे सेवन केले तर तुमच्या पेशी मजबूत होण्यास मदत होते. यामध्ये अनेक पदार्थांचा समावेश असतो. पण, ज्युसचे सेवन केले तर ते अधिक फायदेशीर ठरते. त्यासाठी वर्कआऊटनंतर बीटाचा ज्युस प्यायल्यास तुमच्या मांसपेशी बळकट होण्यास मदत होते. बीटाच्या ज्युसला 'सूपर ज्युस' असेही म्हणतात. कारण एखाद्या खेळाडूला खेळण्यासाठी ऊर्जा देण्याचे काम हे ज्युस करते. बीटाचे ज्युस प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. तसेच यामध्ये लोह, मॅग्नेशिअम, फोलेट आणि अँटीअ‌ॅक्टीडन्टचे सर्व गुण असतात. त्यामुळे वर्कआऊटनंतर या ज्युसचे सेवन केल्यास नक्कीच फायदा होतो.

बीट अन् गाजरच्या ज्युसने वजन होतेय झटपट कमी -
दररोज बीट आणि गाजरच्या ज्युसचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. गाजरामध्ये 'अ' जीवनसत्व असल्याने डोळ्यांच्या समस्याही दूर होतात. बीटमुळे शरीरातील हिमोग्लोबीन प्रमाणात राहते. ज्यांना डोळ्यांच्या समस्या असतील किंवा डोळ्यांनी अत्यंत कमी दिसत असेल अशा रुग्णांनी नियमित ३ महिने गाजर आणि बीटाचा ज्युस प्यायलास त्यांचा चष्मा देखील सुटतो. 

बीटाचे पानंही असतात फायदेशीर -
बीटचे जमिनीतून काढल्यानंतर त्याचे पानं आपण फेकून देतो. मात्र, बीटापेक्षा जास्त पौष्टीक तत्व या पानांमध्ये असते. त्याचे सेवन केल्याने चेहरा चमकायला लागतो. तसेच पाचनशक्ती सुधारण्यास देखील मदत होते. ज्यांना बद्धकोष्टतेची समस्या असेल त्यांनी बीटाच्या पानांचा ज्युस नियमित प्यावा. त्यामुळे मोठ्या आतड्यांमध्ये सुधारणा होऊन पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते.

काय सागंतेय संशोधन -
इंग्लंडमधील नॉर्थम्ब्रिया विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार, इतर पदार्थांच्या तुलनेत  बीटाचे ज्युस प्यायल्याने मांसपेशी मजबूत होतात. काही रुग्णांना बीटांचे ज्युस देण्यात आले, तर काही जणांना साधारण खाद्यपदार्थ देण्यात आले. मात्र, ज्यांना बीटाचे ज्युस दिले ते लवकर ठणठणीत झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या मांसपेशींमध्ये लवकर सुधारणा पाहायला मिळाली. तसेच शरीरावरील कुठल्या भागावर सूजन आल्यास ते देखील बीटाच्या ज्युसमुळे कमी होते.

कधी करायचे सेवन? -
वर्क आऊट सेशन संपल्यानंतर किंवा वर्क आऊट करताना मध्ये थोडी विश्रांती घेऊन तुम्ही या ज्युसचे सेवन करू शकता.  त्यामुळे नंतर पुन्हा व्यायाम करण्यासाठी शरीर तयार होत असते. तसेच तुम्हाला मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे असेल तर स्पर्धेपूर्वी या ज्युसचे सेवन करा. त्यामध्ये तुमचाच विजय होईल.

(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Begging Prohibition Bill: भारतात भीक मागणे बेकायदेशीर करणारे 'हे' पहिले राज्य बनणार, नवीन विधेयक मंजूर, कधी लागू होणार?

Nashik Municipal Corporation : थकीत कर वसुलीसाठी महापालिकेचा नवा डाव; एका रुपयाची बोली लावून मालमत्ता ताब्यात

Modi and Xi Jinping meeting : अखेर मोदी अन् जिनपिंग यांच्या भेटीचा मुहूर्त ठरला! , ट्रम्प ‘टॅरिफ’वरही होणार चर्चा?

E20 पेट्रोल चुकूनही वापरू नका! 'या' कार कंपनीने ग्राहकांना दिला सल्ला, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Cyber Fraud : व्हॉट्सॲपवरील मैत्री पडली महागात; नाशिकमधील विवाहितेला १६ लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT