Cough esakal
health-fitness-wellness

वातावरण बदलंय, अशी घ्या तब्येतीची काळजी!

गेले दोन दिवसांपासून वातावरण अचानक बदललं आहे

सकाळ डिजिटल टीम

गेले दोन दिवसांपासून वातावरण अचानक बदललं आहे. अचानक वेगाने वारे वाहत आहेत. तसेच अनेक ठिकाणी पाऊसही पडला आहे. त्यामुळे वातावरणातील (Climate Change) या बदलाचा सर्वांना खूप त्रास (Health Problem)होऊ शकतो. अशा वातावरणामध्ये तुम्हाला तुमच्या शरीराची (Body) विशेष काळजी घेणे आवश्यक असते. रात्री घराबाहेर पडू नये. सुती उबदार कपडे घालावे, पाणी भरपूर प्यावे, हातमोजे, पायमोजे, स्वेटर , कानटोपी , रग यांचा वापर करावा, असे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने काळजी घेण्याविषयी आवाहन केले आहे.

bp

ब्लड प्रेशर वाढू शकते- थंडीमुळे रक्तदाब कमी जास्त होण्याची शक्यता असतो. ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी अशा वातावरणात विशेष काळजी घेणे गरजेचे असते. रक्तदाबाच्या समस्येमुळे डोके दुखणे, हायपरटेंशन अशा सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन लगेच औषधोपचार करावेत.

Cold-Cough patients

सर्दी, खोकला - हवा बदलल्यावर अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. अशावेळी शक्यतो घराच्या बाहेर पडताना चेहरा झाकून बाहेर पडा. तसेच सर्दी झाल्यास लगेच पाण्याची वाफ घ्या. सर्दीसाठी काढा पिणेही फायद्याचे ठरू शकते.

joint pain

अंगदुखी - सध्या थंडी खूप आहे. वारे वाहत असल्याने गारवा अधिक वाढला आहे. परिणामी उन मिळणे कमी झाले आहे त्यामुळे व्हिटॅमिन डीच्या कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे हाडे दुखणे, मांस पेशी जखडणे अशा विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशा आजारांपासून वाचण्यासाठी शक्यतो थंड हवेत घराच्या बाहेर निघू नका. तसेच ज्या पदार्थांमधून डी जीवनसत्व मोठ्याप्रमाणात मिळेल असे पदार्ध खा.

cough

श्वास घेण्यास त्रास- थंडीमध्ये अनेकांना सर्दीचा त्रास होतो. तसेच कफही वाढतो. कफ झाल्यावर श्वास घ्यायला त्रास होतोय अशावेळी हा त्रास होत असल्यास गरम पाणी पिण्याने घशाला आराम मिळेल. तसेच वाफारा घेतल्याने चोंदलेले नाक मोकळे व्हायला मदत मिळेल. अगदीच थकल्यासारखे जाणवत असेल तर एनर्जी मिळण्यासाठी तूम्ही सुप पिऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT