How To Get Rid Of Fat  
health-fitness-wellness

Belly Fat कमी करण्यासाठी 'हे' उपाय केल्याने होतील फायदे

चुकीच्या जीवनशैलीमुळे लोकांच्या तब्येतीवर परिणाम होतो आहे

सकाळ डिजिटल टीम

वेळी अवेळी खाणं आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) लोकांच्या तब्येतीवर परिणाम होतो आहे. पोट आणि कंबरेवर फॅट-चरबी मोठ्या प्रमाणात साचल्यावर ती कमी करणेही कठीण असते. जर तुम्हालाही वजन आणि चरबी कमी करायची असेल तर काही उपाय करणे गरजेचे असते. यासाठी सायकल चालविल्याने फायदा होऊ शकतो. जीममध्ये तासनतास वर्कआउट करताना जेवढा फायदा मिळतो तेवढाच सायकल चालवल्याने होतो. सायकल चालवल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो. मांसपेशी मजबूत होतात आणि चरबीही कमी होते.

Cycling Benefits

सायकलिंगमुळे कॅलरीज कमी होतात- एका संशोधनानुसार, वजन कमी करण्यासाठी व्यायाम केल्याने तुम्ही आठवड्यातून २ हजार कॅलरीज बर्न कराव्या लागतात. पण,नियमित सायकल चालविल्याने दर तासाला ३०० कॅलरीज बर्न होतात. म्हणूनच तुम्ही जितकी जास्त सायकल चालवाल तितक्या जास्त कॅलरीज बर्न होतील. पर्यायाने शरीरातील फॅट कमी होईल, पण यासाठी सायकल चालवण्यासोबतच योग्य डाएट खाणं गरजेचं आहे.

Cycling Benefits

रोज किती सायकल चालवावी?- सायकल चालविल्याने मसल्स टोन होतात, तसेच हाडे मजबूत होतात. वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. अनेक संशोधनातून, दररोज एक तास सायकल चालवून तुम्ही ३०० कॅलरीज बर्न करू शकता, असे समोर आले आहे. त्यासाठी आरोग्य तज्ञ दररोज 30 ते 60 मिनिटे सायकल चालवण्याचा सल्ला देतात.

अशाप्रकारे करा जास्तीत जास्त सायकलचा उपयोग

- बाजारात, शाळा किंवा अगदी ऑफिसला जाण्यासाठीही तुम्ही सायकल वापरू शकता.

- कॅलरीज कमी करण्याबरोबर इतर गंभीर आजारांपासून तुम्ही सायकल चालविल्याने वाचू शकता.

-सायकल चालविल्याने तुम्ही हृदयाच्या समस्या, स्ट्रोक, मधुमेह, डिप्रेशन या आजारापासून दूर राहता.

- सायकलिंगमुळे नैराश्य, तणाव आणि चिंता यासारखे मानसिक आजार कमी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT