brush the teeth esakal
health-fitness-wellness

महिनाभर ब्रश न केल्यास काय होईल?

आरोग्याच्या दृष्टीने दात स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे असते.

सकाळ डिजिटल टीम

आरोग्याच्या दृष्टीने दात स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे असते. पण अनेक लोकं दातुनने ब्रश करतात. पण बहुतेक लोकं ब्रशनेच दात घासतात. रोज आंघोळ केली नाही तरी रोज सकाळी ब्रश केला जातो. पण, असे बरेच लोक आहेत ज्यांना ब्रश करण्यासाठी प्रयत्न करावासा वाटत नाही. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने महिनाभर ब्रश केला नाही तर त्याच्या दातांचे काय होईल? हे पाहणे गरजेचे आहे.

brsush

येतील या समस्या

१) तोंडाला वास - महिनाभर ब्रश केला नाही तर तोंडातून खूप वास येईल, तुम्हाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या लोकांना खूप त्रास होईल. शिवाय तुमच्या दातांचे नुकसान होईल ते वेगळेच.

२) घाणीचा थर साचेल- एक महिना ब्रश न केल्यामुळे, दातांवर घाणीचा कडक थर जमू लागतो. तो नंतर कितीही वेळा ब्रश केला तरी उतरणार नाही. त्यामुळे नंतर तो काढण्यासाठी तुम्हाला डेंटिस्टची गरज लागले. हा थर जमा होताच दातांचा पांढरा रंगही निघून जाईल.

३) खाणे कठीण होईल- महिनाभर ब्रश न केल्याने दातांमध्ये बॅक्टेरिया जमा होतात. आधीच दातांमध्ये सुमारे 700 प्रकारचे 60 लाख बॅक्टेरिया आहेत. ही संख्या तुम्ही ब्रश न केल्यामुळे आणखी वाढले. हे बॅक्टेरिया दातांमध्ये पोकळी निर्माण करतील शिवाय हिरड्या कमकुवत करतील. तुम्हाला नंतर नीट काही खाताही येणार नाही.

४) दात किडतील- ब्रश न केल्यास तुमच्या दातांची बॅक्टेरिया आणि रोगांशी लढण्याची ताकद संपेल. दात किडतील तसेच पडू लागतील. तुमचे सर्व दात पडायला काही महिने लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT