Dog Therapy for stress 
health-fitness-wellness

Dog Therapyमुळे तणाव होईल १० मिनिटात दूर! संशोधनात दावा

हा अभ्यास प्लॉस वन जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे

सकाळ डिजिटल टीम

प्राणी आणि माणसातील मैत्री जुनी आहे. त्यात माणसंही कुत्र्यांना पाळतात. त्यांची मैत्री अधिक जमते. वैद्यकीय शास्त्राने या दोघांची मैत्री वर्तणूक सुधारण्यासोबत आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, दहा मिनिटांच्या 'डॉग थेरपी'मुळे लोकांची चिंता आणि वेदना काही मिनिटांत नाहिशी होऊ शकते, असे म्हटले आहे. हा अभ्यास प्लॉस वन जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

कॅनडाच्या सास्काटून कॉलेजच्या संशोधकानी रूग्णालयात दाखल केलेल्या जवळपास २०० रूग्णांचा अभ्यास केला. हे सर्व रूग्ण रॉयल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल होते. कुत्र्याची एक जात, मर्फी (विशेष प्रशिक्षण दिले गेले), रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या संपर्कात होती, असे संशोधकांनी सांगितले. वैद्यकीय शास्त्रात याला 'डॉग थेरपी' असे नाव दिले आहे.

Pet Dog

असा केला अभ्यास

संशोधनात सहभागी झालेले रूग्ण दोन भागात विभागले गेले. एका गटात तीव्र वेदनांमुळे ग्रस्त असलेल्या लोकांचा समावेश होता. तर दुसऱ्या गटात चिंताग्रस्त रूग्णांचा समावेश होता. दोन्ही गटातील रुग्णांना दहा मिनिटे ‘डॉग थेरपी’ दिली गेली. 'डॉग थेरपी'नंतर सुमारे 43 टक्के लोकांच्या दिर्घकाळ होत असलेल्या वेदना गायब झाल्या. तर, चिंताग्रस्त असलेल्या सुमारे 48 टक्के रुग्णांना त्याचा लाभ झाला, असे आढळून आले.

रूग्णांची स्थिती पाहून दिली थेरेपी

रुग्णांची स्थिती पाहून त्यांना ही थेरपी देण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले. जर एखाद्या रुग्णाने मरफी कुत्र्यासोबत वेळ घालवला तर रुग्णाच्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसी नावाचे हार्मोन विकसित होते, ज्यामुळे रुग्णाची चिंता कमी होण्यास मदत होते. तसेच रुग्णाचा त्रासही कमी होतो.

वैद्यकीय शास्त्रासाठी ठरेल वरदान

या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. कॉलिन डेल म्हणाले की, हे संशोधन आगामी काळात वैद्यकीय शास्त्रासाठी वरदान ठरेल. ही थेरपी दीर्घकाळ रुग्णालयात राहणाऱ्या लोकांसाठी फायद्याची ठरू शकते. पन्नास वर्षांवरील व्यक्तींमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या दिसून येतात. अशा रुग्णांसाठी ही थेरेपी मदत करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur: कोल्हापुरात MH 09 वगळता इतर वाहनांसाठी 'प्रवेश कर', महापालिकेचा निर्णय तुघलकी; विरोधकांचा संताप

Womens T20 WorldCup: २४ चेंडूत वादळ, दक्षिण आफ्रिकेचा केला धुव्वा! महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची दणदणीत सुरुवात

मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला आश्वासक नायक; 'दादा, एक गुड न्यूज आहे' फेम ऋषी मनोहरचा नवा धमाका! १९ जूनला काय होणार खास?

दोर बांधायला विसरले, बंजी जंपिंगवेळी निष्काळजीपणा; २१ वर्षीय तरुणीला तशीच फेकली, जागीच मृत्यू

Mumbai News: मुंबईतील स्मशानभूमी होणार प्रदूषणमुक्त, 'कार्बनमुक्त स्मशानभूमी वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली' बसवणार

SCROLL FOR NEXT